28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय गोलंदाजांचा फलंदाजीत धडाका

भारतीय गोलंदाजांचा फलंदाजीत धडाका

टीम लय भारी

कोलंबो :-  भारत–श्रीलंका मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना चांगलाच रंगतदार ठरला. भारताने हा सामना जवळपास गमावलाच होता. पण दीपक चहर याने धडाकेबाज फलंदाजी केली, अन् त्याला भुवनेश्वरकुमारने उत्तम साथ दिली. त्यामुळे या उत्कंठावर्धक सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात केली (India beat Sri Lanka in this thrilling match).

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात नव्या दमाच्या फलंदाजांचा भरणा आहे. पृथ्वी शॉ व इशान किशन या दोघांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. त्यामुळे शिखरच्या नेतृत्वाखालील या तरूण तडफदार संघाचे मोठे कौतुक झाले होते.

पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय…

सुजय विखेंनी निलेश लंकेंना लगावला खोचक टोला

दुसऱ्या सामन्यात मात्र या तरूण तडफदार फलंदाजांनी नांगी टाकली. पृथ्वी शॉ, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. त्यात कर्णधार शिखर धवनही अपयशी ठरला. फक्त सुर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले (Suryakumar Yadav scored a half century).

भारतीय संघाची ही तडाखेबंद फलंदाजी कोसळली. त्यामुळे भारताचा पराभव निश्चितपणे होणार होता. पण गोलंदाज असलेल्या दीपक चहरने फलंदाजांनाही लाजवेल अशी उत्कृष्ट फटकेबाजी केली. त्याला भुवनेश्वर कुमारने उत्कृष्ट साथ दिली. दोघांमध्ये नाबाद… भागीदारी झाली. त्यामुळे भारतीय संघाने अवघड ठरलेली विजयश्री खेचून आणली.

पुंडलिक विठ्ठलाला वीट फेकून का मारतो? हे माहिती आहे का?

Sri Lanka vs India: Virat Kohli, Ravi Shastri And Others Cheer From Durham As India Win Thriller In Colombo. Watch

भारतीय गोलंदाज दीपक चहर याने उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गोलंदाज असलेल्या दीपक ने पहिल्या ओव्हर मध्ये 2 बाद करून नाबाद 69 धावांची फलंदाजी करीत भारतीय संघाला हरताना वाचवले, दीपक चहर ने भुवनेश्वर कुमार सोबत उत्कृष्ट खेळी खेळत भारताला विजय मिळवून दिला. एकदिवशीय सामन्यात 2-0 अशी खेळी खेळत भारताचे स्थान अढळ केले (India lost 2-0 in the ODIs).

संपूर्ण सामन्यात दीपक चहर 82 गेंद मध्ये 69 नाबाद धावा देत 4 चौके व एक षटक लगावत भारताचे नाव राखण्यात यशस्वी झाले. भुवनेश्वर कुमारने 28 गेंद मध्ये 19 धावा देत 2 चौक्यांसाहित दीपक चहरला साथ दिली. शिखर धवन च्या संघाने आर प्रेमदास या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात श्रीलंका विरोधी खेळी खेळत 3 गडी बाद करून विजय मिळवला.

India beat Sri Lanka in this thrilling match
दीपक चहर

पहिल्या डावात फलंदाजी करीत श्रीलंकेने भारताला 276 धावांचे लक्ष्य दिले. आणि 193 धावा होईपर्यंत भारताचे 7 गडी बाद झाले होते. आणि सामना हातातून जातोय असे समजताच दीपक चहरने भुवनेश्वर कुमारच्या साथीने पहिले अर्धशतक मारताना भारताला विजय मिळवून दिला.

याचशिवाय सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, कृणाल पंड्या यांनीही चोख कामगिरी केली. सुर्यकुमार यादव 53 धावा करीत, मनीष पांडे 37 आणि कृणाल पंड्या 35 धावा करीत विजयास खेचुन आणले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी