अनेकदा फूड डिलीव्हरी पर्सनना डिलीव्हरी दिल्यानंतर टीपची अपेक्षा असते. (Lady Food Delivery Executive) सर्वानाच असा अनुभव कधी ना कधी येतो. काहीतरी कारण काढून मग ते ग्राहकांशी वाद घालतात किंवा नाराजी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात फक्त 655 रुपये टीप मिळाल्याने नाराज डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह भडकली. पुढे तिने जे काय केले ते अत्यंत धक्कादायक आहे. यामुळे ग्राहकाला मनस्ताप तर झालाच शिवाय फूड डिलिव्हरी कंपनीलाही माफी मागावी लागली. काय आहे हे प्रकरण नेमके ते पाहा ..
महिला डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह सुमारे साडेबारा मैल म्हणजे अंदाजे 20 किलोमीटर दूरवरील फूड जॉइंटमधून (रेस्टॉरंट) ग्राहकाच्या घरी फूड पार्सल घेऊन आली. एव्हढया दूरवरून आल्याने तिला टीप मिळावी, अशी अपेक्षा होती. ग्राहकाने तिला 655 रुपये टीप दिली. मात्र, तिला ती अपुरी वाटली. ग्राहक आपले प्रयत्न समजून घेत नाहीत, आपल्या मेहनतीची त्यांना जाणीव नाही, आशा शब्दात नाराजी व्यक्त करीत ती डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह सरळ फूड पार्सल परत घेऊन गेली. खरेतर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हना फूड डिलिव्हरी कंपन्या लांब अंतरासाठी जास्तीचे इंधन दर, इनसेंटीव्ह व इतर लाभ देतच असतात. शिवाय, डेली, वीकली आणि मंथली बक्षिसांचे मिंगही (बोनस) त्यांना दिले जातात. तरीही काही डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह ग्राहकांना नाहक वेठीस धरतात.

ही घटना आहे अमेरिकेतील. आपल्याकडे जसे स्वीग्गी, झोमॅटो हे प्लॅटफॉर्म फूड डिलीव्हरी करतात, तसे परदेशात डोअरडॅश (DoorDash) हा फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहे. याच प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचा हा किस्सा आहे. ग्राहकाने याचा व्हिडिओ ऑनलाईन शेअर केल्यानंतर तो व्हायरल होत आहे. त्यात महिला डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह ग्राहकाला ऑर्डर न देता निघून गेल्याचे दिसत आहे. कारण तिला $8 म्हणजे 8 अमेरिकी डॉलर्स (अंदाजे 655 भारतीय रुपये) ही टीप फारच कमी वाटली. कमी टीपमुळे ती खूप नाराज झाली. तिने ग्राहकाला सुनावले, की टीप पुरेशी नाही कारण तिला डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 40 मिनिटे गाडी चालवावी लागली.
ही डिलीव्हरी गर्ल ग्राहकाच्या घरी पोहोचली तेव्हा त्याने व्हिडिओ रिंग डोअरबेलचा वापर करून तिला पार्सल घराबाहेर ठेवण्यास सांगितले. तथापि, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने आपल्याला ग्राहकाशी संभाषण करणे आवश्यक आहे, असा आग्रह धरला. गोंधळलेल्या ग्राहकाने तिचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने ग्राहकावर तिचे प्रयत्न समजून घेत नसल्याचा आरोप केला. ती म्हणाली, की त्याच्या घरापासून फूड आउटलेट किती दूर आहे, हे त्याला समजते का. तेव्हा ग्राहकाने ते 15-20 मिनिटांच्या ड्राईव्हवर असल्याचा दावा केला. त्यावर डिलीव्हरी गर्ल भडकळी. तिने ग्राहकांच्या डाव्याशी असहमती दर्शवली. डिलिव्हरी देण्यासाठी तिला सुमारे 40 मिनिटे लागली कारण ते ठिकाण सुमारे साडेबारा मैल (20किमी) दूर होते, असे तिने सांगितले. डोअरबेलच्या मागे घरातून गोंधळलेल्या माणसाने एक्झिक्युटिव्हला विचारले, “इतकया दूर डिलिव्हरी लोकेशन होते तर ड्रॉप ऑफ/ ऑर्डर का घेतली?” त्यावर त्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह महिलेने उत्तर दिले, “मला माहीत नव्हते. मला वाटले की तुम्ही मला घसघशीत टीप द्याल. तुम्ही तर फक्त $8 टीप दिली.”
हे सुद्धा वाचा :
वर्क फ्रॉम होम नकोच : ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती
WhatsApp वरून मागवा राशन, JioMart ने सुरू केली सेवा; Amazon आणि Flipkart ला बसणार फटका?
ग्राहकाने डॉलरची टीप पुरेशी आहे, असा आग्रह धरला तेव्हा अस्वस्थ स्त्रीने फूड ऑर्डर डिलिव्हरी न करता परत घेऊन गेली. यामुळे ग्राहक निराश झाला. दरम्यान, व्हीडिओच्या पार्श्वभूमीत आणखी एक आवाज ऐकू येतो, “आठ डॉलर्स? ते खूप आहेत की.” डोअरडॅशने व्हायरल क्लिपबद्दल तातडीने अधिकृत निवेदन जारी केले. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही आमच्या ग्राहक समुदायाची सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेतो आणि DoorDash प्लॅटफॉर्मवर असे अयोग्य वर्तन कधीही सहन केले जात नाही. कंपनी असभ्य वागणूक आजिबात सहन करीत नाही. त्यामुळे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हची सेवा निष्क्रिय केली जाऊ शकते. संबंधित डॅशर म्हणजेच डिलिव्हरी गर्लला कंपनीने काढून टाकले आहे. ग्राहकाच्या घरी जाऊन डोअरडॅश टीमने सहाय्य आणि समर्थन दिले. ग्राहकांना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल डोअरडॅश कंपनीने मनापासून दिलगीरीही व्यक्त केली.