28 C
Mumbai
Saturday, February 17, 2024
Homeएज्युकेशन'स्टार्टअप'साठी नवीमुंबईत होणार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट; अर्थसंकल्पात युवावर्गासाठी मोठ्या तरतुदी

‘स्टार्टअप’साठी नवीमुंबईत होणार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट; अर्थसंकल्पात युवावर्गासाठी मोठ्या तरतुदी

उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. राज्याच्या औद्योगिक विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या तरतूदी करण्यात आल्या आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.9) रोजी विधानसभेत राज्याचा सन 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी कुशल, रोजगारक्षम युवापिढी घडविण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी केल्या आहेत. (Maharashtra Budget 2023 Major provisions for Startups Training Institute to be established in Navi Mumbai)

स्टार्टअप उद्योगांमध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल आहे. राज्यात अनेक छोटे-मोठे स्टार्टअप सध्या यशस्वीपणे सुरु आहेत. तरुणपीढी देखील नोकऱ्यांच्या मागे न लागता स्टार्टअपचा विचार करुन छोटे-मोठे उद्योग करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देत असून स्टार्टअपच्या विकासासाठी राज्य सरकारने देखील आता मोठे पाऊल उचलले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी नवी मुंबईतील कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जी युवापीढी स्टार्टअपमध्ये उतरु पाहत आहे, अशा युवकांना सरकार आता मार्गदर्शन करणार आहे. स्टार्टअपमुळे अनेक तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. मात्र अनेक तरुण सध्या असे ही आहेत, कि त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

त्याच बरोबर उद्योगवाढीसाठी राज्यसरकार लवकरच लॉजिस्टिक पार्क धोरण राबविणार आहे. नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब उभारण्याची घोषणा आज फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. तसेच नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा देखील या अर्थसंकल्पातून केली आहे. तसेच वस्त्रोद्योग, खणिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण देखील राबविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Budget 2023 : इंदूमिल, भिडेवाडा व बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भरीव तरतूद
Maharashtra Budget 2023 : ‘भरीव शिष्यवृत्ती ते नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये’ यंदाच्या बजेटमधील शैक्षणिक सुविधा जाणून घ्या

धनगर समाजासाठी 1 हजार कोटींची तरतूद; निवडणूकांच्या तोंडावर अर्थसंकल्पातून खूश करण्याचा प्रयत्न
अर्थसंकल्पात केलेल्या इतर महत्त्वाच्या घोषणा
– नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या उद्योगाला चालना
– मांघर (महाबळेश्वर)च्या धर्तीवर ‘मधाचे गाव’ हा उपक्रम राज्यभर राबविणार
– 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार
– मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण
– 500 आयटीआयची दर्जावाढ/2307 कोटी रुपये
– 75 आयटीआयचे आधुनिकीकरण/610 कोटी रुपये
– 75,000 शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
– उद्योगांना आवश्यक मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी