30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजरविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम,लांब पल्ल्याच्या गाड्याही...

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम,लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

टीम लय भारी

मुंबई : मध्य रेल्वेकडून ठाणे-दिवा मार्गावर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. यासाठी रविवारी तब्बल 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्री दोन ते सोमवारी मध्यरात्री दोनपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळेमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे(Mega block 24-hour on Sunday will affect Thane-Diva route).

‘या’ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकचा लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. एक जानेवारीला रात्री 11 : 43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11 : 43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंबणार नाहीत.

१ जानेवारीपासून तुमच्या खिशाला बसणार फटका; जाणून घ्या काय बदल होणार आहेत

मलबार हिल ट्रीटॉप वॉकवेच्या बांधकामासाठी BMC देणार 22 कोटींचे कंत्राट

पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून 2 जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत.

लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार

Central Railway to carry out 24 hrs mega block between Kalva-Diva on Sunday

‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

दरम्यान या मेगा ब्लॉकदरम्यान काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमरावती -मुंबई एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, मुंबई आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, डेक्कन क्विन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई -नांदेड राजधानी एक्सप्रेस या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी