28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजमनसे - भाजप एकत्र, पण एकाच मतदारसंघापुरते

मनसे – भाजप एकत्र, पण एकाच मतदारसंघापुरते

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकसभा निवडणुकीपासून राज ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आग ओकत आहेत. केंद्र व राज्यातील भाजप सरकार कसे लोकहितविरोधी आहे हे राज ठाकरे लोकांना पटवून सांगत आहेत. सगळा दारूगोळा भाजपच्या विरोधात वापरत असतानाच आता राज यांनी भाजपशी सूत जमवून घेतले आहे. पण हे सूत केवळ एकाच मतदारसंघापुरते जमविण्यात आले आहे.

वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आशिष शेलार यांच्यासाठी राज यांनी छुपा पाठिंबा दिला आहे. राज आणि आशीष यांची घनिष्ठ मैत्री आहे. या मैत्रीला जागत राज यांनी या मतदारसंघात मनसेचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

परंतु, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात आशीष शेलार यांनी राज यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका केली होती. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप होता.

मनसेच्या पश्चिम उपनगरचे सचिव अल्ताफ खान यांनी वांद्रे मतदारसंघाची मोठी बांधणी केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी खान यांनी ताकद लावली होती. पण मनसेच्या दोन्ही याद्यांमध्ये अल्ताफ यांना संधी दिलेली नाही. किंबहूना मनसेने या मतदारसंघात आपला उमेदवारच जाहीर केलेला नाही.

मनसे पक्ष गाळात चालला आहे. भाजप सरकार मनसेचा गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या स्थितीत मैत्री जपण्यापेक्षा पक्षाची ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. असे असताना राज यांनी शेलार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय अवसानघातकी असल्याची चर्चा राजगडावर रंगली होती. खुद्द मनसैनिकांमधून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

आशीष यांच्या मैत्रीसाठी राज यांनी वांद्रे पश्चिममध्ये निवडणूक न लढण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतल्याची चर्चा आज राजगड कार्यालयात सुरू होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी