32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजसत्तरीतील गणेश नाईकांना लढवायची आहे शेवटची निवडणूक

सत्तरीतील गणेश नाईकांना लढवायची आहे शेवटची निवडणूक

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातून माजी मंत्री गणेश नाईकांचे पुत्र संदीप नाईक यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आज संदीप नाईक यांनी माघार घेतली. आता त्यांच्याऐवजी वडील गणेश नाईक ऐरोलीतून लढणार असून त्यांना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे.
गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या धोरणानुसार वयाच्या पंचाहत्तरीनंतर निवडणुका लढविण्यास संधी दिली जात नाही. गणेश नाईकांचे सत्तरीत आहेत. त्यामुळे आता निवडणूक लढविली नाही, तर पुन्हा कधीच संधी मिळणार नाही. त्यामुळे गणेश नाईकांना शेवटची संधी मिळायला हवी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे संदीप यांनी मोठे मन करून आपला मतदारसंघ वडिलांना दिला आहे.
गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबियांनी आणि राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी गेल्या महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नाईक हे दोन तिकीटांसाठी प्रयत्न करत होते. बेलापूरमधून गणेश नाईक, तर ऐरोलीमधून संदीप नाईक यांना तिकिट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने एकाच कुटुंबात दोन तिकीट देण्यास नकार दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी