27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : राखी सावंत म्हणाली सुशांत सिंह माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला...

VIDEO : राखी सावंत म्हणाली सुशांत सिंह माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला…

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. सुशांतच्या गेल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (Rakhi Sawant Instagram Video) आहे. दरम्यान अभिनेत्री राखी सावंतने एक दावा करत सर्वांना आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. सुशांतचा पुर्नजन्म होणार आणि तो माझ्या पोटातून होणार आहे, असा दावा राखी सावंतने केला आहे. राखी सावंतच्या या दाव्यानंतर सुशांतच्या चाहत्यांकडून तिच्यावर संताप व्यक्त केला जात (Rakhi Sawant Instagram Video) आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

काय म्हणाली राखी इन्स्टाग्रामवर…

राखी सावंतने याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राखी सावंतने सुशांतच्या पुनर्जन्मा चा दावा केला आहे. “मी रात्री झोपली होती आणि अचानक मला धक्का बसला. माझ्या स्वप्नात सुशांत आला होता. मी विचारले की कोण आहे? मग आवाज आला मी सुशांत आहे. माझा विश्वास आहे की सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मी पुन्हा जन्म घेत आहे. माझ्या चाहत्यांना सांग की मी पुन्हा जन्मलो. मी म्हणाले, कसे? त्यानंतर तो म्हणाला, मी लवकरच सांगेन. पुन्हा मी म्हणाले, मला सांग. तर सुशांत म्हणाला, राखी तू लग्न करशील आणि मी तुझ्या पोटी जन्म घेईन”, असं राखी सावंतने इन्स्टाग्रमावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

राखी सावंतच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिच्यावर टीका होत आहे. त्यासोबत या व्हिडीओवर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी नाराजीही दर्शवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी