33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeटॉप न्यूजभारताच्या ऑपरेशन कावेरीची जगभरात चर्चा; वाचा नेमकं प्रकरण

भारताच्या ऑपरेशन कावेरीची जगभरात चर्चा; वाचा नेमकं प्रकरण

सुदान मध्ये लष्कर अणि निमलष्कर यांच्यात संघर्ष पेटून उठला आहे. एकंदरीत सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. मागील दोन आठवड्यांपासून सुदानमध्ये युद्धाचे वातावरण आहे. मुख्यत: या युदधात शंभरपेक्षा अधिक भारतीय नागरीक मृत्युमुखी पडले आहेत. याधर्तीवर सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांची सुटका करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन कावेरी मिशन सुरू करण्यात आले आहे. ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतातील जहाज अणि विमानांच्या साहाय्याने सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांची सुटका करून त्यांना आपल्या मायदेशी आणले जात आहे.

सुदान मधील ह्या लष्करी निमलष्करी मधील भीषण युद्धामुळे 50 लाखापेक्षा अधिक लोकांनी राजधानी खार्टुम सोडुन पलायन केले आहे. अनेक परदेशी नागरीक सुदानमध्ये ह्या युद्धामुळे वीज तसेच पाण्याविना एका खोलीत अडकले गेल्याचे सांगितले जाते आहे. त्यांना हया युद्धामुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे, यात भारतीयांचा देखील समावेश आहे. सुदानमध्ये आपल्या भारत देशातील सुमारे चार ते पाच हजार नागरिक वास्तव्य करीत आहेत. मात्र सुदानमधील दोन गटातील भीषण युद्धामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सुदानमधील भारतीय नागरिकांच्या जीविताला कुठलीही हानी पोचू नये, त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले जावे म्हणून भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन कावेरी हे मिशन सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दाैऱ्यादरम्यान या ऑपरेशन घोषणा केली.

भारताने सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू केले. अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजानं सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये आणावं लागंत आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातं. आतापर्यंत पाच तुकड्यांमध्ये एकूण 967 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये तीन दिवस युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा:

भारतातील ‘या’ 10 खऱ्या समजल्या जाणाऱ्या गोष्टींमागील सत्य!

भारताच्या 5 पट महागाई दर असणारा ‘पाक’ विनाशाच्या उंबरठ्यावर: इम्रान खान

मुंबईत पुन्हा २६/११ घडविण्यासाठी पाकिस्तानचा हस्तक सरफराज मेमन भारतात दाखल

युदधाचे कारण काय?
देशावर ताबा प्राप्त करण्यासाठी सुदानमध्ये सत्ता संघर्षासाठी दोन लष्करी अधिकारींमध्ये युदध छेडले गेले आहे. ज्यात विनाकारण तेथील रहिवासी असलेल्या नागरीकांना अणि परदेशातील लोकांना आपला बळी द्यावा लागतो आहे. असे सांगितले जाते आहे की, सुदानमधील लष्कर प्रमुख अणि निमलष्कर प्रमुख या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सुदानमध्ये कोणाची सत्ता राहील यावरून संघर्ष सुरू आहे. उणीपुरी नावाच्या देशावर ताबा प्राप्त करण्यासाठी हे युदध राजधानी खातुम येथे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.‌ या देशाची संख्या सुमारे साडेचार कोटी इतकी आहे. या सत्ता संघर्षामध्ये दोन्ही गटाकडून गोळीबार, हवाईहल्ले केले जात आहे. या युद्धात अनेक निरागस लोकांना आपला जीव गमवावा लागला.

Operation Kaveri News, Operation Kaveri is a worldwide talk

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी