30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमबालवाडीतील विध्यार्थ्यांना क्रूरपणे मारणाऱ्या दोन शिक्षिकेना अटक

बालवाडीतील विध्यार्थ्यांना क्रूरपणे मारणाऱ्या दोन शिक्षिकेना अटक

लहान मुलांना बालवाडीत क्रूरपणे मारणाऱ्या दोघा शिक्षिकेचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे.सीसीटीव्ही फुटेज मध्ये या दोन शिक्षिका लहान मुलांना क्रूरपणे मारताना दिसत आहेत, एवढा पुरावा त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळण्यास पुरेसा असल्याचं म्हणत कोर्टाने अटकर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.जिनल छेडा आणि भक्ती शाह अस अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेची नाव आहेत.

कांदिवली येथे ही बालवाडी आहे. या ठिकाणी 29 मुलांनी ऍडमिशन घेतलं आहे.दोन वर्षाची मुलं या बालवाडीत जात होती.या मुलांना शिकवण्यासाठी दोन महिला शिक्षिका आणि त्यांना दोन सहायक महिला होत्या.या बालवाडीतील काही मुलं घरी आल्यावर आक्रमकपणे, विचित्र वागत असल्याचं ही लक्षात आलं.याबाबात चौकशी केल्यावर दोन मुलांना त्यांच्या शिक्षिका क्रूरपणे मारत असल्याचं लक्ष्यात आलं.पालकांनी बालवाडीच्या मालकाची भेट घेतली.त्यांच्याकडे तक्रार केली. बालवाडीच सीसीटीव्ही फुटेज मिळवलं.त्यात भयानक प्रकार समोर आला. या दोन शिक्षिका लहान मुलांना क्रूरपणे
मारत आहेत, त्यांना इकडून तिकडे खेचत आहेत.त्याचे गाल ओढत आहेत.त्यांना जोरात चिमटे काढत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून उघडकीस आलं.

याबाबत तात्काळ कांदिवली पोलीस स्टेशन येथे पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. मात्र, गुन्हा दाखल होताच जिनल छेडा आणि भक्ती शाह या शिक्षिकानी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई सेशन कोर्टात गेल्या.यावेळी मुलांच्या तक्रारदार पालकांनाही या केस मध्ये इंटरव्हेनन करण्याची परवानगी देण्यात आली.आम्ही मुलांना मारलं नाही. त्यांना समजावत होतो, अस शिक्षकेच्या वकिलांच म्हणणं होतं.मात्र,बळीत मुलांच्या पालकांनी जेव्हा कोर्टात सीसीटीव्ही फुटेज सादर केलं.तेव्हा सर्वाना घाम फुटला.दोन विद्यार्थ्यांना शिक्षिका क्रूर पणे मारत असल्याचं दिसून आलं.

हे सुद्धा वाचा

बसमध्ये मोबाईल वापरला तर गुन्हा दाखल होणार; वाचा बेस्टचा नवा ‘नियम’ 

अविनाश भोसले यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

सोलापूर शहरातील ५०० एकर जमिनीवर उभारणार ऑक्सिजनयुक्त वनउद्यान : सुधीर मुनगंटीवार

हे कोर्टाने पाहिल्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. दोन चार वर्षाची मुलं शिक्षण घेण्याच वय त्याच.या वयात त्यांना अशी मारहाण केली जात आहे.त्याच्यावर वाईट परिणाम होत असतो. कोवळ्या मनाची मुलं आहेत.त्यांना योग्य प्रकारे हाताळायला हवं.अस असताना त्यांना जी मारहाण झाली आहे, ती चुकीची आहे. सीसीटीव्ही मध्ये सर्व कैद झालं आहे.हे पुरावे पुरेसे आहेत या शिक्षकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यासाठी , अस म्हणत कोर्टाने दोन्ही शिक्षिकेचा जामीन अर्ज फेटाळून लावताना म्हटलं होतं. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्या नंतर जिनल छेडा आणि भक्ती शाह या दोघींना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी