30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजरेल्वे आरक्षण आठवडाभर ६ तास बंद राहणार, हे आहे कारण...

रेल्वे आरक्षण आठवडाभर ६ तास बंद राहणार, हे आहे कारण…

टीम लय भारी

नवी दिल्ली: रेल्वेसाठी तिकिट बुक करत असाल किंवा काही माहिती जर तुम्ही शोधत असाल तर येत्या आठवड्याभरासाठी तुमची थोडीशी गैरसोय होऊ शकते. रेल्वेने डेटा अपग्रेडेशनसाठीची मोठी प्रक्रिया हाती घेतल्याने संपूर्ण आठवडाभर रेल्वेचे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम बंद राहण्याची शक्यता आहे(passenger reservation system will be closed for the next six hours)

 त्यामुळे या कालावधीत तिकिट आरक्षणात अनेक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागू शकतो. रेल्वेची पीआरएस यंत्रणा दररोज सहा तासांच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळेच या कालावधीत रेल्वेच्या आरणक्षणाशी संबंधित सर्व सेवा बंद राहणार आहेत.

राज्यात इंधनाचे दर कमी होणार नाहीत : अजित पवार

कंगना ऐवजी मुस्लिमाने विधान केले असते तर..; असदुद्दीन ओवेसी संतापले

भारतीय रेल्वेची पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम (Passenger Reservation System) ही येत्या काही कालावधीसाठी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. येत्या आठवड्याभरासाठी ही सिस्टिम बंद राहणार आहे. रेल्वेकडून कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठीच हा पुढाकार घेण्यात येणार आहे. त्यामुळेच रेल्वे प्रवाशांना या कालावधीत तिकिट आरक्षण करता येणार नाही. सिस्टिम डेटा अपग्रेडेशनसाठीचा हा पुढाकार असल्याचे भारतीय रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नव्या ट्रेनचाही समावेश या नव्या डेटानुसार वेळापत्रकात होणार आहे, असे रेल्वेमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोनापूर्व काळाचा मोठ्या प्रमाणातील जुन्या ट्रेनचा डेटा आणि सध्याचा पॅसेंजर बुकिंगचा मेल तसेच एक्सप्रेस ट्रेनचा डेटा अपडेट करण्याचे उदिष्ट रेल्वेसमोर आहे. त्यामुळेच ही संपुर्ण प्रक्रिया अतिशय काळजीपूर्व करणे गरजेचे आहे. अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेत ही संपुर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळेच तिकिटांच्या आरक्षणावर कोणताही परिणाम घडू नये अशी अपेक्षा करण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे.

डेविड वॉर्नरला मिळालेल्या ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताबावर, शोएब अख्तरची नाराजी

Railways reservation system to be shut down during lean business hours

 येत्या २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही डेटा अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू राहील. दररोज रात्री २३.३० वाजल्यापासून ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत ही डेटा अपडेट करण्याची प्रक्रिया चालणार आहे. या सहा तासांच्या कालावधीत पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम (PRS)शी संबंधित तिकिट आरक्षण, रद्द करणे, तिकिटाबाबतची चौकशी, तसेच आरक्षणाशी संबंधित इतर सर्व सुविधा बंद राहणार आहेत.

या सहा तासांच्या कालावधी एडव्हान्स चार्टिंग म्हणजे रेल्वे तिकिट आरक्षण याद्या अद्ययावत करण्याचा पर्याय सुरू असेल. तसेच रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक १३९ देखील नियमितपणे सुरू असेल असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेकडून या कालावधीत प्रवाशांना अपगेड्रेशनच्या पद्धतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेकडून शुक्रवारी करण्यात आलेल्या घोषणेनुसार रेल्वेचा मेल आणि एक्सप्रेसचा स्पेशल टॅग काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच कोरोनापूर्व काळानुसार तिकिटांचे दर हे तत्काळ पद्धतीने अंमलात येतील असेही स्पष्ट करण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी