28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजपाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या क्रिकेटपटूंनी राहुल द्रविडच्या निर्णयाचे केले स्वागत

पाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या क्रिकेटपटूंनी राहुल द्रविडच्या निर्णयाचे केले स्वागत

टीम लय भारी

मुंबई: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे कौतुक केले जाते. आता देखील त्याच्या एका निर्णयाचे स्वागत अगदी पाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या क्रिकेटपटूंनी केले आहे (Rahul Dravid decision was welcomed by cricketers from Pakistan to Australia).

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुलच्या नावाची चर्चा असताना राहुलने पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा (NCA) प्रमुख या पदासाठी अर्ज केला आहे. द्रविडचा या पदावरील कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपला असून त्याने पुन्हा एकदा याच पदासाठी अर्ज केला आहे.

क्रिकेटपटू सूर्यकुमार आणि पृथ्वीने केली ‘ बाजीगर ‘ चित्रपटाच्या कॉमेडी सीनची पुनरावृत्ती

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या गावात रस्त्याचे काम सुरू, बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार

एकीकडे रवि शास्त्री यांचा आगामी टी-20 विश्व चषकानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपत आहे. त्यांनी यानंतर हा करार वाढवणार नसल्याची इच्छा दर्शवल्याची माहितीही समोर येत असल्याने द्रविडची या जागी वर्णी लागेल अशा चर्चेलाही चांगलेच उधाण आले आहे. द्रविड मुख्य प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार असून नुकत्याच श्रीलंका दौऱ्यावरही त्याने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

Rahul Dravid decision welcomed by Pakistan to Australia
द्रविड मुख्य प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार

सलमान बट्टने केले द्रविडच्या निर्णयाचे स्वागत

पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट म्हणाला, द्रविडने पुन्हा एकदा NCA चा प्रमुख या पदासाठी अर्ज देऊन खूप चांगले केले. द्रविड यामुळे केवळ कनिष्ठ स्तरावर भारतीय क्रिकेट सांभाळत नसून वरिष्ठ संघातही चांगले खेळाडू तयार करत आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा

Rahul Dravid only candidate to apply for NCA’s Head of Cricket post, BCCI extends deadline

ब्रॅड हॉगही द्रविडच्या समर्थनात

पाकिस्तानच्या सलमान बट्टच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने केलेल्या ट्विटमध्ये त्याने द्रविडच्या निर्णयाचे स्वागत करत लिहिले आहे की, NCA चा प्रमुख राहिल्यास द्रविड भारतासाठी आंतरराष्ट्रीय दर्जावर चांगले योगदान देऊ शकतो.

तसेच इंडियन टीमचा मुख्य प्रशिक्षक बनण्यापेक्षा NCA चा प्रमुख हे पद मला महत्त्वाचे वाटत असून द्रविडने त्याच ठिकाणी राहायला हवे (Brad Hogg also supported Dravid).

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी