29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजRane VS Pawar : निलेश राणेंनी शरद पवारांना डिवचले, रोहित पवारांवरही खालच्या...

Rane VS Pawar : निलेश राणेंनी शरद पवारांना डिवचले, रोहित पवारांवरही खालच्या पातळीवरील टीका

टीम लय भारी

मुंबई : एकेरी व वाईट शब्दांचा वापर करण्यात माजी खासदार निलेश राणे माहीर आहेत. पण साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी आज थेट शरद पवारांनाच ( Rane Vs Pawar ) डिवचले. त्यावर आमदार रोहित पवार यांनी त्यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावर राणे रोहित पवारांवर भयंकर संतापले, अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राणेंनी रोहित पवारांवर आसूड ओढले.

साखर उद्योगाला मदत करण्याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्या अनुषंगाने निलेश राणे यांनी ( Rane Vs Pawar ) एक ट्विट केले. साखरेवर महाराष्ट्रात किती पैसे खर्च झाले याचे ऑडीट व्हायला हवे असे निलेश राणे यांनी नमूद केले.

Rane Vs Pawar

साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँका, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षानुवर्षे साथ देत आले आहेत. तरीही कारखान्यांना वाचवा ? अशा शब्दांत राणे यांनी शरद पवार ( Rane Vs Pawar ) यांना ट्विटरवर डिवचले आहे.

राणे यांच्या या ट्विटला आमदार रोहित पवार ( Rane Vs Pawar ) यांनी प्रत्युत्तर दिले. पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरावस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचविल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडतात. त्यामुळे मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असे रोहित पवार यांनी म्हटले.

परंतु रोहित पवार ( Rane Vs Pawar ) यांनी केलेला ‘कुक्कुटपालन’चा उल्लेख निलेश राणे यांना चांगलाच झोंबला. राणे थेट एकेरीवरच उतरले. मतदार संघावर लक्ष दे. सगळीकडे नाक टाकू नकोस. नाहीतर साखर कारखान्यासारखी हालत होईल असे राणे यांनी रोहित पवारांना उपदेश केला.

राणे एवढ्यावरच थांबले नाहीत. हे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की, का अस्वस्थ होतात कुणास ठाऊक ? या वांग्याला सांगा, ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले. हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय अशा गलिच्छ शब्दांचाही प्रयोग निलेश राणे ( Rane Vs Pawar ) यांनी केला.

ट्विटरवरील या वाकयुद्धानंतर पवार समर्थकांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार ( Rane Vs Pawar ) हे आमदार आहेत. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. ते कुक्कुटपालनावर बोलले. कोंबडी चोरी प्रकरणावर नाही. अशानेच तुम्हाला लोकांनी दोन वेळा घरी बसवले. अशा शब्दांत पवार समर्थकांनी राणे यांच्यावर टीका केली.

तर राणे समर्थकांनीही पवारांवर ( Rane Vs Pawar ) टीका केली. पवार फक्त साखरेवरच का बोलतात. ते कृषी मंत्री असताना वांग्याना भाव का मिळाला नाही अशीही टीका राणे समर्थकांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : ‘शरद पवार साहेब, आपण घराबाहेर पडू नका’

Coronavirus : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांची घेतली बैठक

Sharad Pawar demands bail package for ailing sugar industry

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी