30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रCoronaeffect : भुकेल्याची भूक भागविण्यासाठी वाघोलीतील तरुणाई सरसावली

Coronaeffect : भुकेल्याची भूक भागविण्यासाठी वाघोलीतील तरुणाई सरसावली

अजित जगताप : टीम लय भारी

सातारा : कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे. भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात अशा बिकट परिस्थितीत कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील स्वराज प्रतिष्ठान, जय हनुमान तालीम संघ व तरुणाई भुकेल्याची भूक भागविण्यासाठी गावात मदतीसाठी हात पसरत आहेत. त्यांना सढळ हस्ते मदत करून सर्वधर्मसमभाव मानणारे गावकरी (Coronaeffect) साथ देत आहेत.

विधानसभा अध्यक्ष पदापर्यंत मजल मारणारे काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत शंकरराव जगताप यांच्यामुळे वाघोली नाव प्रकाशझोतात आले. सर्व धर्मसमभाव मानणा-या शिकवणीचा शुभारंभ कोरेगावात जपला जातो. याची प्रचिती आली आहे. वाघोली येथे भटकंती करीत काही वर्षांपूर्वी गोपाळ समाज्यातील दोन -चार कुटूंब स्थिरावले. त्याला आता जमाना झाला असून सध्या गोपाळ समाज हा वाघोलीकर झाला आहे. लग्नसराईत वाध्य वाजविणे, शेत मजूर, स्टोव्ह, छत्री व इतर किरकोळ गृहपयोगी वस्तू दुरुस्ती करून तसेच भिक्षा मागून उपजीविका करीत होते. पण, कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाला आणि त्यांना रोजगार सोडून घरात बसावे लागले आहे. उपासमारी होऊन सुध्दा लॉकडाउनच्या कडक अंमलबजावणीने त्यांना पाला बाहेर पडणे मुश्किल झाले होते. अशा वेळी वाघोली गावातील तरुणाई मदतीला धावली. घरोघरी हात पसरून गावातून ज्वारी, चटणी, भाजी, घेवडा, तांदूळ,डाळी, मीठ-तिखट,तेल गावातून गोळा केले व वाघोली येथील कोरोनामुळे उपासमारीची दाहकता सोसणा-या गोपाळ समाजाला वाटप केले.

माणुसकीच्या भावनेतून (Coronaeffect) सुमित भोईटे मित्र परिवाराच्या प्रयत्नाने वाघोली व पिंपोडे येथील पत्रकार दिगंबर नाचणं व इतर पत्रकार आणि वाठार पोलीस ठाण्याचे स. पो. उपनिरीक्षक महेश पाटील, पोलिस ज्ञानदेव चोरट, संताजी चव्हाण यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

स्वतःसाठी कधीही हात न पसरणारे (Coronaeffect) वाघोली येथील तरुणाई गोपाळ समाजासाठी अन्नदाता ठरली आहे. गावातील साहील भोईटे, हर्ष भोईटे, विराज भोईटे, मयुर जाधव, महेश शेलार, ऋतिक भोईटे, मंगेश भोईटे, आश्विन भोईटे, विशाल भोईटे, प्रज्वल भोईटे, अभिजित भोईटे, सम्राट भोईटे, योगेश राजे, पंकज भोईटे, निरंजन गाडे, सद्दाम पठाण, रोहित शिंदे, चेतन बाबर, तुषार लाहिगुडे, निखिल पाटणकर, सुमित भोईटे, युसुफ पठाण आणि सर्व मित्र परिवार व ग्रामस्थ मंडळी यांनी या मदतीसाठी सहभाग घेतला होता. त्यांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी आभार मानले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी