31 C
Mumbai
Thursday, July 4, 2024
Homeटॉप न्यूज‘कोरोना’च्या लढाईसाठी न्यायाधीशही रणांगणात  

‘कोरोना’च्या लढाईसाठी न्यायाधीशही रणांगणात  

टीम लय भारी                    

सातारा : कोरोना विरोधात लढाईमध्ये डॉक्टर्स, पोलीस, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. परतुं चक्क न्यायधीश गावोगावी जाऊन नागरिकांची जनजागृती करतायेत. हे वाचून विश्वास बसणार नाही, परतुं हो हे सत्य आहे. त्या न्यायाधिशांच नाव आहे अमितसिहं मोहने. मोहने हे दिवाणी व फौजदारी न्यायालय दहिवडमध्ये मुख्य न्यायधीश म्हणून कार्यरत आहे.

देशासह राज्यात कोरोनाचा थैमान सुरु आहे. सरकार,प्रशानाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. जनता हैराण झाली आहे. कसं जगायचं असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घरातच थांबावं लागत आहे. परतुं मुख्य न्यायधीश अमितसिंह मोहने हे घरात बसले नाही तर ते चक्क गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत.

मोठ्या पदावर असलेली व्यक्ती असल्यानंतर बडेजाव असतोचं परंतु मुख्य न्यायधीश अमितसिंह मोहने फिरताना कोणताही बडेजाव नाही. शांतपणे ते पोलीस कर्मचा-यांसह गावोगावी जावून गावातील परिस्थितीचीमाही घेत आहेत. ग्रामस्थांसोबत चर्चा करत आहेत. त्यांना सूचना करत आहेत. परंतु ज्यावेळी नागगरिकांना माहिती मिळते सूचना करणारे, मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही न्यायधीस आहे तर सर्वांना धक्का बसतो. त्या न्यायधीशांबद्दल मनात आदर निर्णाण होत आहे.

जेव्हा न्यायधीश मार्गदर्शन करतात तेव्हा…

मुख्य न्यायधीश मार्गदर्शन करतात त्यावेळी सर्व नागरिक शांत पणे त्यांच ऐकून घेतात. सूचनांच पालन करतात न्यायधीश जेव्हा मोलाचं मार्गदर्शन करत आहेत तेव्हा सर्वजण त्यांच्या सूचनांच पालन करण्यासाठी प्रतिसाद देतात.

या न्यायधीशांना मुक्या जनावरांचीही काळजी…

गरिब गरजूंना मदत करत असताना मुक्या जनावरांनाही चारा, पाणी मिळून देण्यासाठी न्यायधीश मोहने हे विशेष लक्ष देत आहेत. नागरिकांना देवाच्या रुपाने मोहने यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या कहरमध्ये न्यायधीश मोहने यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी