32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटॉप न्यूजCorona : कोरोनामुक्त पोलीस प्लाझ्मा दान करणार

Corona : कोरोनामुक्त पोलीस प्लाझ्मा दान करणार

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाबाधित शेकडो पोलिसांनी आतापर्यंत जीव गमावलेला आहे. मात्र जे बरे झालेले राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आहेत ते प्लाझ्मा दान करणार आहेत. (Police Donate Plasma) हा प्लाझ्मा इतर कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देणार आहे. पोलिसांनी हा चांगला निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्लाझ्मादानासाठी पहिल्या टप्प्यात 16 जवान पात्र ठरले आहेत. त्यातील सहा जणांनी ससून रुग्णालयात प्लाझ्मा दान केले आहे. पुणे विभागातील सुमारे 200 जवान कोरोनाबाधित झाले होते. त्यातील 85 जवानांचे प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी 65 जणांच्या रक्ताचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले जाणार आहे.

आतापर्यंत राज्य राखीव दलाच्या सहा जवानांनी प्लाझ्मा दान केला आहे. यापुढेही टप्याटप्याने आणखी जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यासोबत पोलिसांनी इतर कोरोनामुक्त रुग्णांनाही प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केलं आहे. प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्याने प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठविले जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी