29 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeटॉप न्यूजतुषार भोसलेंनी गुजरातमधील बंद मदिरांसाठी आंदोलन करावे : राष्ट्रवादीचा चिमटा

तुषार भोसलेंनी गुजरातमधील बंद मदिरांसाठी आंदोलन करावे : राष्ट्रवादीचा चिमटा

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील मंदीरे सुरू करावीत यासाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी मोठा थयथयाट केला होता. तसे प्रयत्न त्यांनी आता गुजरातमधील बंद मंदिरांच्या बाबतीतही करावा, अशी मागणी ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’चे उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांनी केली आहे ( Tushar Bhosle should agitated against BJP government ).

अहमदाबादमध्ये ‘कोरोना’चा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे तिथे कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मंदिरांतही प्रवेश बंदी केली आहे. ‘कोरोना’चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गुजरात सरकारने हा निर्णय घेतला आहे ( BJP government kept temples shut down in Gujrat ).

महाराष्ट्रातही ठाकरे सरकारने ‘कोरोना’चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यात राज्यभरातील मंदीरे बंद ठेवली होती. पण भाजपच्या तुषार भोसलेंनी त्याचे राजकारण केले.

हे सुद्धा वाचा

चंद्रकांत पाटलांना चार वर्षांत जे जमले नाही, ते बाळासाहेब थोरातांनी एक वर्षात करून दाखविले

भाजपला शिवरायांच्या नावाची ॲलर्जी,  राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा लंडनमध्ये झेंडा

तुळजाभवानी मंदीर परिसरात आंदोलने केली. सामान्य लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. मंदीरे उघडण्यासाठी भोसले यांनी ‘महाविकास आघाडी’ सरकारविरोधात आंदोलने केली. तशीच आंदोलने आता गुजरात सरकारच्या विरोधात करावीत, असा सल्ला जगन्नाथ काकडे यांनी दिला आहे ( NCP given suggestion to Tushar Bhosle ).

गुजरातमध्ये भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी अधिक आधिकारवाणीने गुजरात सरकारला कानपिचक्या द्याव्यात. देवापासून भक्तांना तोडण्याचा गुजरात सरकारला अधिकार नाही, याची आठवण भोसले यांनी भाजप सरकारला करून द्यावी, असा चिमटा काकडे यांनी काढला आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी