33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजइंडिया बुल कंपनीकडून झोपडीधारकांचा पाणीपुरवठा बंद

इंडिया बुल कंपनीकडून झोपडीधारकांचा पाणीपुरवठा बंद

टीम लय भारी

मुंबई : दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील माधानी इस्टेट इंडिया बुल कंपनीने कंपनीसमोर सुमारे 40 झोपडीधारकांचे पिण्याचे पाणी बंद केले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार इंडिया बुल कंपनी च्या समोर गेल्या अनेक वर्षापासून झोपडीधारक येथे झोपडीधारक वास्तव्य करीत आहेत. त्या संदर्भातील सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत(Water supply to hut owners stopped by India Bull Company).

सदर झोपडीधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसे त्यांचे कोठेही पुनर्वसन न करता जी दक्षिण, जी उत्तर विभाग आणि इंडिया बुल कंपनी त्यांच्या झोपड्या उध्वस्त करीत आहेत. सदर झोपडीधारकांचे पिण्याचे पाणी बंद करण्यात आले असून सदरच्या झोपड्या खाली करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशी अरुण रखमाजी ससाने यांनी दिली.

Water supply to hut owners stopped by India Bull Company
अरुण ससाणे (झोपडीधारक नेते)

यासंदर्भात सदर झोपडीत धारकांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले यांनाही पत्र दिलेले आहे. कोरोना सारख्या महामारीनंतर एकीकडे लोकांचे उद्योग धंदे नोकऱ्या उध्वस्त झाले आहेत त्यातच अशाप्रकारे पालिका आणि इंडिया कंपनीकडून जी कारवाई झोपडी चालकांवर केली जात आहे याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संबंधित कंपनीने आमची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा याविरोधात कंपनीच्या विरोधात उग्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा अरुण ससाने यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

महागाईत अजून भर पडणार, एप्रिलपासून सिलेंडरच्या किंमतीत होणार वाढ

आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

BMC to set up panel of residents to oversee maintenance, upgradation at Shivaji Park

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी