27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केली डॉक्टरांच्या मानधनात वाढ

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केली डॉक्टरांच्या मानधनात वाढ

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी (Bonded medical officer) आणि आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (Contract Medical Officer) यांना समान तसेच वाढीव मानधन (Honorarium) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मानधनात घसघशीत वाढ करण्याबरोबरच कंत्राटी डॉक्टरांचे आणि बंधपत्रित डॉक्टरांचे मानधन समान करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाविरोधातील लढ्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. डॉक्टरांच्या या लढाईची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतली आहे. त्यानुसार बंधपत्रित आणि कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोठा निर्णय घेतला असून बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या डॉक्टरांनाही सरकारने दिलासा दिला आहे. कंत्राटी डॉक्टरांचे आणि बंधपत्रित डॉक्टरांचे मानधन समान करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आज झालेल्या संपादकांच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख मुख्य सचिव अजोय मेहता (Chief Secretary Ajoy Mehta) यांनी केला. त्यामुळे आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार, इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार, इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केली डॉक्टरांच्या मानधनात वाढ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आज झालेल्या संपादकांच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख मुख्य सचिव अजोय मेहता (Chief Secretary Ajoy Mehta) यांनी केला.

मानधनात अशी होईल वाढ…

१) आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार

२) आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टरांना ७० हजार ऐवजी ८५ हजार

३) इतर भागातील एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजारांऐवजी ७० हजार

४) इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टरांना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल

हे सुद्धा वाचा

Lockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

Jitendra Awhad attacks on BJP : जितेंद्र आव्हाडांनी भाजपला झोडपले

Anil Gote scathing on Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कपटी, नीच, दगलबाज, हृदयशून्य व्यक्ती

मुंबई असुरक्षित राज्यकारभार नागपुरातून चालवा, ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी