29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रDeepika Padukone : दीपिका पादुकोण 'लॉकडाऊन'मध्येही कामात व्यस्त

Deepika Padukone : दीपिका पादुकोण ‘लॉकडाऊन’मध्येही कामात व्यस्त

टीम लय भारी

मुंबई : देश दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउनमध्ये आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अधिकाधिक लोक घरूनच (Work From Home) काम करत आहेत आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिचे नाव देखील या यादीत सामील आहे. दीपिका पादुकोण ‘लॉकडाऊन’मध्येही कामात व्यस्त आहे. ती या दिवसांमध्ये ऑनलाईन स्क्रिप्ट्स नॅरेशन (Online Scripts Narration) मध्ये आपला वेळ घालवत आहे.

Deepika Padukone
अविश्वसनीय अदाकारी

दीपिका ( Deepika Padukone ) कलाकार या नात्याने, या लॉकडाउनच्या वेळेचा सदुपयोग करते आणि चित्रपट निर्मात्यांसोबतच्या वर्चुअल मीटिंग सुरु आहेत. हा दीपिकासाठी नवा आधुनिक डिजिटल पर्याय आहे.

Meals for corona patients : कोरोनाबाधित रुग्णांना निकृष्ठ जेवण देणा-या सीइओंना जिल्हाधिका-यांनी फटकारले

दीपिका (Deepika Padukone) आपल्या आधी घोषित झालेल्या प्रोजेक्ट्सवर देखील काम करते आहे आणि सोबतच आपले आगामी प्रोजेक्ट निवडण्यासाठी आणि जगभरातील चाहत्यांसाठी अधिक यादगार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून नव्या स्क्रिप्ट्स पण ऐकत आहे.

जर लॉकडाउन नसता, तर दीपिका (Deepika Padukone) आता श्रीलंकेमध्ये शकुन बत्रा यांच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असती, ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे देखील दिसणार आहेत.

आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात, दीपिकाने (Deepika Padukone) आपल्याला अनेक उल्लेखनीय चित्रपट आणि व्यक्तिरेखा दिल्या आहेत, ज्यामध्ये पिकू, ये जवानी है दीवानी मधील नैना, बाजीराव मस्तानी मधील मस्तानी, कॉकटेलची वेरोनिका इत्यादींची यादी न संपणारी आहे.

Deepika Padukone

ज्यांनी आपल्या मनात खास जागा निर्माण केली आहे. अशा दीपिका (Deepika Padukone) या अभिनेत्रीने खरोखरच आपल्या अभूतपूर्व फॅन फॉलोइंगसोबत आपल्या करियरला अत्युच्च ठिकाणी पोहोचवले आहे.

दीपिकाची (Deepika Padukone) अविश्वसनीय अदाकारी आणि आपल्या व्यक्तिरेखांना आकार देण्याची हातोटी निश्चितच कौतुकास्पद आहे.

हे सुद्धा वाचा

Lockdown 5.0 : शरद पवारांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरेंकडून ‘लॉकडाऊन’ शिथील होण्याची शक्यता

Jitendra Awhad attacks on BJP : जितेंद्र आव्हाडांनी भाजपला झोडपले

Anil Gote scathing on Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कपटी, नीच, दगलबाज, हृदयशून्य व्यक्ती

मुंबई असुरक्षित राज्यकारभार नागपुरातून चालवा, ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी!

डॉन अरुण गवळीच्या सुट्टीला लॉकडाऊन; कारागृहात शरण होण्याचे आदेश!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी