28 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeव्हिडीओयशवंतराव चव्हाणांचा पदस्पर्श झालेल्या शाळेला शरद पवारांची मदत

यशवंतराव चव्हाणांचा पदस्पर्श झालेल्या शाळेला शरद पवारांची मदत

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,हे ओळखून सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ता.४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले,जि.सातारा येथे रयत शिक्षण संस्था स्थापन केली(Sharad Pawar’s help to the school which was sacked by Yashwantrao Chavan)सदर संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. शरद पवार गेल्या ३५ वर्षांपासून सदर संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.याच रयत शिक्षण संस्थेची शाळा न्यु इंग्लिश स्कूल, मेहमानगड जि. सातारा येथे काही दिवसांपूर्वी स्नेह मेळवा पार पडला.सदर शाळेला ५६ वर्ष पूर्ण झालेली आहेत.या मेळाव्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कोणी राज्याचे जीएसटी आयुक्त आहेत तर कोणी उद्योजक अश्या विविध क्षेत्रांमध्ये ह्या शाळेचे विद्यार्थी कार्यरत आहेत.सदर व्हिडीओमध्ये माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख, हे संस्थेच्या कार्या बद्दल सदर व्हिडीओमध्ये माहिती देत आहेत.संस्थेच्या शाळेत जवळपास साडेचार लाख विद्यार्थी शाळा शिकत असून अनेक विद्यार्थी उद्योजक,न्यायाधीश, आणि उत्तम प्रशासक म्हणुन नावलौकीकास आलेले आहेत.सदर संस्थेच्या मोठ्या प्रमाणावर शाखा आहेत असे असले तरी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.आरटीफिशियल इंन्टेलिजन्स त्याच बरोबर जागतिक पातळीवर होणार्या बदलानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे प्रयत्न सदर संस्था करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी