28 C
Mumbai
Saturday, September 2, 2023
घरव्हिडीओVIDEO : देवेंद्र फडणवीस म्हणतात, एक महिन्यानंतरही मंत्री नाहीत ही नामुष्की !

VIDEO : देवेंद्र फडणवीस म्हणतात, एक महिन्यानंतरही मंत्री नाहीत ही नामुष्की !

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला एका महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर मुहूर्त सापडला आहे. अखेर ९ ऑगस्ट या दिवशी मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. पण ज्याप्रमाणे भाजपने शिवसेनेच्या एकेक आमदारांना गळाला लावून महाविकास आघाडी सरकारला पाडले, अशी तत्परता त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार कारण्यासाठी का दाखवली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याने आता देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मंत्रिमंडळ विस्तार यावर टीका करताना दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिना मंत्र्यांचाच निर्णय घेता येत नाहीये, अशा प्रकारची नामुष्की ही कुठल्याही सरकारवर आली नाही, असे वक्तव्य त्यांनी या व्हिडीओमध्ये केलेले दिसत आहे. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारने असा प्रकार केल्याने याचे उत्तर कोण देणार ? असा प्रश्न विरोधकांसह सामान्य नागरिकांनी सुद्धा उपस्थित केला आहे. पण आता शिंदे -भाजप सरकारच्या मंत्री मंडळालाच एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठवली आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी