33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमंत्रालयEknath Shinde Cabinet Expansion : तब्बल ३० जण मंत्रीपदाची घेणार शपथ !

Eknath Shinde Cabinet Expansion : तब्बल ३० जण मंत्रीपदाची घेणार शपथ !

नव्या सरकारमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. एकूण कितीजण मंत्रीपदाची शपथ घेणार याविषयी सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे मंत्रीमंडळाचा मंगळवारी सकाळी ११ वाजता शपथविधी होत आहे. नव्या सरकारमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. एकूण कितीजण मंत्रीपदाची शपथ घेणार याविषयी सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. ‘लय भारी’ला मिळालेल्या माहितीनुसार २५ पेक्षा जास्त मंत्री उद्या शपथ घेणार आहेत. हा आकडा ३० पर्यंत असू शकतो असेही सूत्रांनी सांगितले. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांनी शपथ घेतली तर जवळपास अख्खे मंत्रीमंडळच आस्तित्वात आल्यासारखे होईल. कायद्यानुसार आमदार संख्येच्या १५ टक्के म्हणजे एकूण ४२ मंत्री नेमण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत. पण पहिल्याच टप्प्यात सगळी पदे भरली जात नाहीत. असे असले तरी ३० आकडा हा सुद्धा मोठा असल्याचे बोलले जात आहे.

मंत्र्यांच्या शपथविधीची राजभवनवर जोरदार तयारी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मंत्रालयातील ‘सामान्य प्रशासन विभागा’चीही धावपळ सुरू आहे. शपथविधीसाठी येणारे मंत्री व त्यांचे निकटवर्तीय यांना पासेस देण्याची लगबग सुरू आहे. मोजकेच पास देण्याविषयी सुचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात १५ ते १६ मंत्री शपथ घेतील, अशी चर्चा होती. परंतु २५ पेक्षा जास्त मंत्री शपथ घेणार आहेत. हा आकडा ३० च्या आसपास असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे – पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, संजय शिरसाट, भरत गोगावले आदी नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे. मंत्र्यांच्या नावांबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : दरेकर, पंकजाताई, राम शिंदे, पडळकर, सदाभाऊ यांना मंत्रीमंडळात स्थान नाही

Eknath Shinde cabinet Expansion : पहिल्या दिवशी मंत्रीपदाची झूल, दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या औताला झुंपणार !

Eknath Shinde : ‘प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो’

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक नांदेड दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे उद्याचा मंत्रीमंडळ विस्तार होईल की नाही, या विषयी साशंकता व्यक्त केल्या जात होत्या. परंतु मंत्रीमंडळ विस्तार निश्चित आहे. त्यात कोणताही बदल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेड जिल्हाप्रमुख व इतर नेत्यांची हकालपट्टी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी नांदेड गाठल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी