29 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरव्हिडीओVIDEO : भविष्यातील जनउद्रेकाची नांदी, तरूण घुसला ईडीच्या दारी !

VIDEO : भविष्यातील जनउद्रेकाची नांदी, तरूण घुसला ईडीच्या दारी !

देशातील एका महत्वाच्या केंद्रीय यंत्रणेविरुद्ध (Directorate of Enforcement) लोकांचा आक्रोश का वाढत आहे ? हा एक मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे. देशभरात केंद्रीय यंत्रणा विरुद्ध होणाऱ्या या घटनांना कोण जबाबदार आहे यावर विचार करण्याची गरज आहे. पण ईडी कडून करण्यात येणाऱ्या कारवाया या सूड भावनेने असल्याचा आरोप सुद्धा लोकांकडून करण्यात येत आहे.

देशात चालू असलेल्या ईडीच्या (Enforcement Directorate) जोरदार कारवायांमुळे अनेक लोकांमध्ये आक्रोश दिसून येत आहे. अशाच एका संतापलेल्या युवकाने थेट ईडी मुंबई कार्यालयात जाऊन आपला राग व्यक्त केला. या युवकाचा ईडी कार्यालयातील घुसखोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. व्हिडिओ मध्ये युवक जबरदस्ती कार्यालयात शिरून ‘युवक काँग्रेस जिंदाबाद’ अशा घोषणा देत ईडीच्या नामफलकावर काळ्या रंगाचा स्प्रे मारताना दिसत आहे. तसेच व्हिडिओ मध्ये पोलिसांनी युवकाने केलेल्या कृत्याबद्दल घटनास्थळीच मारहाण केलेली दिसून येतेय.

देशातील एका महत्वाच्या केंद्रीय यंत्रणेविरुद्ध लोकांचा आक्रोश का वाढत आहे ? हा एक मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे. देशभरात केंद्रीय यंत्रणा विरुद्ध होणाऱ्या या घटनांना कोण जबाबदार आहे यावर विचार करण्याची गरज आहे. पण ईडी कडून करण्यात येणाऱ्या कारवाया या सूड भावनेने असल्याचा आरोप सुद्धा लोकांकडून करण्यात येत आहे. या गोष्टीचा विस्फोट एक दिवस होणार हे मात्र यावरून आता दिसू लागले आहे. तसेच देशाचे भविष्य अंधारात आहे, असे देखील म्हणणे काही अंशी चुकीचे ठरणार नाही.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी