33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमुंबईSanjay Raut :संजय राऊतांच्या डायरीत पैशांच्या गंभीर नोंदी, एकनाथ शिंदेंसोबतही व्यवहार

Sanjay Raut :संजय राऊतांच्या डायरीत पैशांच्या गंभीर नोंदी, एकनाथ शिंदेंसोबतही व्यवहार

संजय राऊतांच्या डायरीत रहस्यमय नोंदी एकनाथ शिंदेंचीही आर्थिक गुपीते संजय राऊतांच्या डायरीमध्ये ईडीला सांकेतिक नोंदी मिळाल्या आहेत. या नोंदीचा अर्थ लावणे हे ईडी पुढे मोठे आव्हान आहे. या सांकेतिक नोंदीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुपीते असण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

संजय राऊतांच्या डायरीमध्ये ईडीला सांकेतिक नोंदी मिळाल्या आहेत. या नोंदीचा अर्थ लावणे हे ईडी पुढे मोठे आव्हान आहे. या सांकेतिक नोंदीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुपीते असण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडीने कोठडी वाढवली आहे. त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे.त्यानंतर ईडीच्या तपासाला आणखी वेग आला आहे. संजय राऊत यांच्या रुममध्ये ईडीला एक डायरी सापडली आहे. त्या डायरीमध्ये त्यांनी सांकेतिक भाषेमध्ये नोंदी केल्या आहेत. संजय राऊतांच्या डायरीत पैशांच्या गंभीर नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत व्यवहार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या तपासात त्यांचे नाव असलेल्या नोंदी  सापडल्या होत्या.

संजय राऊत छाती छोकपणे ईडीला आव्हान देत होते. आपण ईडीला घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अटक केल्यानंतर देखील त्यांचा तोच आत्मविश्वास कायम होता. एक ना एक दिवस आपल्यावर ईडीची धाड पडेल हे संजय राऊत यांना माहित होते. त्यामुळे ईडीच्या जाळयातून सुटण्यासाठी त्यांनी अगोदरच तयारी केली होती का? याची शंका आल्या शिवाय राहत नाही. रविवारी ईडीने केलेल्या तपासात संजय राऊत यांच्या घरात सापडलेले १० लाख रुपये हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर होते. तर दीड लाख रुपये घर खर्चासाठी होते. ही रक्कम अयोध्देसाठी होती. ती एकनाथ शिंदेंना दयाची होती, असे संजय राऊत यांनी तपासात सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

Kishore Kumar : सुपर कलाकार किशोर कुमार सुद्धा होते बाथरुम सिंगर

Sanjay Raut :संजय राऊत प्रकरणी स्वप्ना पाटकर यांना कोर्टाकडून दिलासा नाही

Eknath Shinde Cabinet Expansion: दीपक केसरकरांचे तर्कट, जेव्हा दिल्लीवाऱ्या वाढतात, तेव्हा मंत्रीपदाच्या याद्या अंतिम झाल्याचे समजायचे

त्यामुळे भाजपला साथ देणारे एकनाथ शिंदे हे देखील संजय राऊतांनी आखलेल्या योजनेमुळे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज केलेल्या तपासात संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या डायरीमध्ये सांकेत‍िक भाषा वापरुन आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या सांकेत‍िक नोंदीचा उलगडा कोण करणार? त्या मागचे नेमे रहस्य काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी १ लाख ३४ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडेने रविवारी अटक केली आहे.

आज झालेल्या सुनावणीनंतर ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यांची शनिवारी चौकशी होणार आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये अनोळखी व्यक्ती पैसे पाठवत असल्याचे ईडीच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे हा अनोळखी व्यक्ती नेमका कोण आहे? एक व्यक्ती आहे की, अनेक व्यक्ती आहेत, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. संजय राऊत यांनी या ठिकाणी देखील विशेष योजना केल्याचा  संशय आहे. या प्रकरणाची गुंतागुंत वाढण्याची शक्यात नाकारता येत नाही. कारण संजय राऊत यांचे हे घोटाळा प्रकरण रहस्य कथेप्रमाणे आहे. त्यांच्या या रहस्याचा उलगडा करणारा शेअरलॉक होम्स कोण? असेल याची देखील उत्सुकता लागली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी