27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeव्हिडीओVIDEO : मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरी गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात...

VIDEO : मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरी गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले

गणपती हा आनंदाचा सण. पावसाळा असला तरी हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. सगळे जण गणपतीच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतात. अखेर आज तो दिवस आला. त्यामुळे सगळेजण गणेशोत्सवाचा आनंद लुटत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी गणरायाचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, गणेश गणेश मोरया असा जयघोष यावेळी करण्यात आला. यावेळी सुवासिनींनी गणपती बाप्पांचे औक्षण केले. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. गणपतीची विधीवत पूजा केली. त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. यावर्षी राज्यात गणेशोत्सवाची धूम शिगेला पोहोचली आहे. राज्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. आज अनेकांना गणेशोत्सवाची सुटी देखील आहे. लहान मुले देखील या उत्सवाचा आनंद घेत आहेत. आज सगळेकडे चैतन्यमय आणि भक्तीमय वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांतील सणांच्या बंदीची कसर या वर्षी भरुन निघणार आहे हे मात्र नक्की. दोन दिवसांपासून पावसाने देखील उघडीप दिली आहे. त्यामुळे या वर्षी गणपती आणतांना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. रोजच्या धावपळीतून वेळ काढून घरात सुख शांती आणि आरोग्य नांदावे यासाठी गणपतीकडे सगळयांनी मनोभावे प्रार्थना केली.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी