33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रChandrakant Patil : पुण्याच्या गर्दीत चर्चा रंगली चंद्रकांतदादांची, वाचा काय घडलं...

Chandrakant Patil : पुण्याच्या गर्दीत चर्चा रंगली चंद्रकांतदादांची, वाचा काय घडलं…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुण्याच्या वाहतुकीत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, यामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. आज अनेक ठिकाणी मिरवणुका निघाल्या असल्याने वाहन चालक आज चांगलेच अडचणीत सापडले आहेत, तर काही ठिकाणी मोठी वाहतूक कोंडीच पाहायला मिळत आहे.

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा जल्लोषात सगळे सण – समारंभ साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. पुण्यात शहरात देखील यंदा मोठ्या थाटामाटात सणाला सुरूवात झाली आहे असून मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी लांबून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने दर्शनाला झूंबड उडत आहे, त्यामुळे पोलिसांना सुद्धा बारकाईने लक्ष ठेवावे लागत आहे. आज मानाच्या गणपतींची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली त्यावेळी या मिरवणूकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चक्क दुचाकीवरून दर्शन घेतले आणि एकच चर्चा सुरू झाली.

आज मानाच्या पाच गणपतींबरोबरच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ तसेच भाऊ रंगारी गणपती या सगळ्याच मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आली. यावेळी या सगळ्याच बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी चंद्रकांत पाटील पोलिसांसोबत दुचाकीवरून फिरत असल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे पोलिसांनी पुण्याच्या वाहतूक मार्गिकेत काही बदल केले आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांची यामुळे कोंडी झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र वाहन बाहेर काढण्याऐवजी चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांसोबत दुचाकीवरून दर्शन घेण्यात धन्यता मानली.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरी गणपती बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यात आले

Farmer Help : ‘सरकार’ थेट पोहोचणार शेतकऱ्यांच्या बांधावर!

Jayant Patil : शेतकरी चिंताग्रस्त आहे पण सरकारने एक ‘दमडी’ दिली नाही – जयंत पाटील

दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पाटील यांनी इतर मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतले. आज सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमंडळाच्या विद्युत रोषणाईचे उद्धाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यात मानाच्या गणपतींना मोठे स्थान असल्यामुळे त्याची परंपरेप्रमाणे या वर्षी सुद्धा जल्लोषात स्वागत करण्यात आले असून त्याचा मान यावेळी चंद्रकांत पाटील यांना मिळाला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुण्याच्या वाहतुकीत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, यामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. आज अनेक ठिकाणी मिरवणुका निघाल्या असल्याने वाहन चालक आज चांगलेच अडचणीत सापडले आहेत, तर काही ठिकाणी मोठी वाहतूक कोंडीच पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पुण्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. विसर्जन मिरवणुकीला ही संख्या अधिक असते. त्यामुळे या काळात वाहतूक व वाहनांच्या पार्किंचा प्रश्‍न निर्माण होतो. या काळात नागरिकांनी पोलिसांनी वाहतूक व पार्कींगबाबत केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनच पाटील यांनी यावेळी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी