24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeव्हिडीओVideo : भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना लावले पळवून

Video : भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना लावले पळवून

9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले, परंतु भारतीय लष्कराने प्रसंगावधान राखत या चिनी सैनिकांना फक्त रोखलेच नाही तर त्यांचा पाठलाग करून त्यांना परत जाण्यास भाग देखील पाडले.

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाच्या जवळपास अडीच वर्षांनंतर चीनने पुन्हा एकदा LAC अर्थात लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलच्या पूर्वेकडील भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले, परंतु भारतीय लष्कराने प्रसंगावधान राखत या चिनी सैनिकांना फक्त रोखलेच नाही तर त्यांचा पाठलाग करून त्यांना परत जाण्यास भाग देखील पाडले. चीनच्या सैनिकांकडून वर्षातून अनेकदा असे घुसखोरीचे प्रयत्न करण्यात येतात. परंतु त्यांचा हा डाव कायमच भारतीय सैनिकांकडून उधळून लावला जातो. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैनिक चीनच्या सैनिकांना घुसखोरी केल्यामुळे चांगलाच चोप देताना दिसून येत आहेत.

दरम्यान, सर्वच भारतीयांकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या संख्येने व्हायरल करण्यात येत आहे. या व्हिडिओला शेअर करताना नेटकरी ‘भारत माता कि जय’ तसेच भरतोय सैन्याचे कौतुक देखील करत आहे. या व्हिडिओमध्ये भरतोय सैनिक चिनी सैनिकांना काठ्यांनी मारताना दिसून येत आहेत. प्रत्येक भारतीय सैनिकाच्या हातात यावेळी लाकडी काठ्या असल्याचे दिसत आहे. परंतु हा व्हिडीओ आताचा नसून जुना असल्याचे अनेक लोकांकडून सांगण्यात येत आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी