31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमुंबईमुंबईत अंमली पदार्थाच्या तस्करीत झाली वाढ

मुंबईत अंमली पदार्थाच्या तस्करीत झाली वाढ

मुंबईत एकीकडे नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्याची आयोजकांनी तयारी सुरु केली असतानाच दुसरीकडे अंमली पदार्थ तस्करांनीही नशा करणाऱ्यांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचविण्याची कसरत सुरू केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे मुंबई शहरात पकडलेले 50 लाख रुपये किमतीचे हेरॉईन. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हे ड्रग्ज राजस्थानमधून मुंबईत आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

मुंबईतील मालवणी पोलिसांनी 50 लाख रुपयांच्या हेरॉइनसह एका 35 वर्षीय बाऊन्सरला अटक केली आहे. अटक आरोपी सोहेल अहमद शेख याने हे अंमली पदार्थ नववर्षाच्या उत्सवात विकण्यासाठी आणल्याचा पोलिसांना संशय आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला फक्त 15 दिवस राहिलेले असताना आता शहरात अंमली पदार्थांची आवक वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय यंत्रणांनीही मुंबई विमानतळ, नवी मुंबई बंदरातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. नववर्षानिमित्त मुंबई आणि आसपासच्या राज्यांमध्ये होणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्टीला मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा केला जातो. अशा स्थितीत मुंबई पोलिसांसह सर्व तपास यंत्रणाही ड्रग्ज तस्करांवर लक्ष ठेवून असतात. मालवणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने हे ड्रग्ज राजस्थानातून मुंबईत आणल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो एका खाजगी कंपनीत बाऊन्सर म्हणून काम करतो, असेही त्याने सांगितले. मालवणी पोलिसांकडून सध्या आरोपी सोहेल शेखची चौकशी करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणाचा अधिक तपास देखील पोलीस करत आहेत.

नवीन वर्षात अंमली पदार्थाच्या मागणीत वाढ
2023 वर्ष संपायला अजून एक पंधरवडा बाकी आहे, पण मुंबई शहरात अंमली पदार्थांच्या मागणीमध्ये आणि त्यांच्या किंमतीत वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषत: एलसीडी आणि कोकेन ड्रग्जची मागणी नवीन वर्षाच्या पार्ट्यांमध्ये सर्वाधिक असते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एलसीडीच्या एका डॉटची किंमत सामान्य दिवसात सात ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान असते, जी या कालावधीत दहा ते पंधरा हजारांपर्यंत वाढते. कोकेनच्या बाबतीतही असेच आहे, साधारणपणे पाच हजार रुपये प्रति ग्रॅम दराने विकले जाणारे कोकेन नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच आठ ते दहा हजार किंवा त्याहून अधिक किमतीला विकले जाते. याशिवाय एमडी ड्रग्ज देखील आजकाल लोकांची पसंती बनली आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा राजीनामा; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वरून सरकारचा निषेध

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले माजीद मेनन तृणमूल काँग्रेसमध्ये

‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सीमाशुल्क विभागाव्यतिरिक्त डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यावरून याचा अंदाज लावता येतो. गेल्या महिन्यात महसूल डीआरआयच्या पथकाने एका परदेशी नागरिकाकडून 20 कोटी रुपयांचे तीन किलो 600 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. हे कोकेन दारूच्या दोन बाटल्यांमध्ये आणले होते. अधिकारी समीर वानखेडे यांच्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 11,000 किलोहून अधिक ड्रग्ज जप्त केले आहेत. या कारवाईत 58 जणांना अटकही करण्यात आली आहे.

एनसीबीने जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन, मेफेड्रोन, गांजा, हेरॉइन आणि एलएसडीचा समावेश आहे. एनसीबीनुसार, सध्या बाजारात काळ्या कोकेनला खूप मागणी आहे. जी 20 हजार प्रति ग्रॅम दराने विकली जाते. तर मेफेड्रोन 3000 रुपये प्रति ग्रॅम दराने विकले जाते. समाजातील उच्चवर्गीय लोकांमध्ये ब्लॅक कोकेनची मागणी जास्त आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!