31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्रिकेटक्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आज सायंकाळी जाहीर होणार IPL 2024 वेळापत्रक

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आज सायंकाळी जाहीर होणार IPL 2024 वेळापत्रक

IPL 2024 Schedule : आज आयपीएलच्या 17 व्या हंगामाबद्दल क्रिकेटप्रेमींना मोठी अपडेट मिळणार आहे. आजच आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत अपडेट दिली होती. 22 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होतील, असे धुमाळ यांनी सांगितलं होतं. यंदाच्या आयपीएलच्या हंगामाचं पहिल्या 15 दिवसांचे वेळपत्रक जाहीर होईल. उर्वरित सामन्याचे वेळापत्रक हे लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की, जाहीर करण्यात येतील, अशी माहिती अरुण धुमाळ यांनी दिली आहे.

सामने कधी आणि कुठे पाहू शकाल?

आज 22 फेब्रुवारी 2024 रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं वेळापत्रक सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर  आयपीएलचं वेळापत्रक लाईव्ह पाहता येईल.  जिओ सिनेमा अॅपवर मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. साधारणपणे आयपीएलचा सलामीचा सामना गतविजेते आणि उप विजेते यांच्यामध्ये होतो. त्यानुसार,पहिला सामना धोनीच्या चेन्नई विरोधात शुभमन गिल याच्या गुजरात संघामध्ये होऊ शकतो.

हेही वाचा : कौतुकास्पद! नांदेडच्या ZP मध्ये ‘ई-फाईल ट्रेकिंग सिस्टिम’ सुरू; 582 फाईल्स निघाल्या निकालात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी