25 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरव्हिडीओVideo : जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या

Video : जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या

एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 354 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून कमी होण्याऐवजी वाढतअसल्याचेच दिसत आहे. चार दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या शोदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. याप्रकरणी नुकतीच त्यांची सुटका झाली असताना आता त्यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 354 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. 13 नोव्हेंबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्यात बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करून परतत होते, तेव्हा हि घटना घडल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक महिला नेत्या उभ्या राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करत हा विनयभंगाचा गुन्हा होऊच शकत नाही, तर या प्रकरणी त्या कोर्टात जाणार असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना बदनाम करण्यासाठी राज्य सरकारकडून, गृहखात्याकडून अथवा पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर केला जात असेल तर या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ. एखाद्या महिलेला गर्दीतून बाजूला करणे हा गुन्हा असेल तर मुंबई शहरात प्रत्येक दिसवसाला लाखोंमध्ये गुन्हे दाखल होतील. त्यामुळे गृह खात्याचा असा गैरवापर होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हे खात त्यांच्याकडे घ्यावे.’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!