25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeव्हिडीओVIDEO : भारत जोडो यात्रेत आई चिमुकल्यांसह सहभागी

VIDEO : भारत जोडो यात्रेत आई चिमुकल्यांसह सहभागी

भारत जोडो यात्रेसंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आता सोशल मीडियावर एका आईचा व्हिडीओ शेअर होत आहे. या यात्रेत ही आई तिच्या दोन लहान मुलांसह सहभागी झालेली आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अनेक तरुण-तरुणी, वयोवृद्ध इतकेच नाही तर लहान मुले नटून-थटून या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील नागरिकांनी या यात्रेला प्रचंड पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून या यात्रेत सहभागी झालेले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत या यात्रेत चालणे असे स्वप्न घेऊन अनेकजण भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले आहेत. या यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते नाही तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर सामाजिक संघटना देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत. या यात्रेसंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आता सोशल मीडियावर एका आईचा व्हिडीओ शेअर होत आहे. या यात्रेत ही आई तिच्या दोन लहान मुलांसह सहभागी झालेली आहे.

सध्या देशात हिंसेचे आणि एकमेकांविरोधात द्वेष पसरवण्याचे काम सुरु आहे. परंतु या यात्रेमुळे माझ्या मुलांना देशात सुरु असलेल्या घटनेची माहिती जवळून मिळेल असे मत व्यक्त करत ही आई तिच्या दोन लहान मुलांसह, तसेच पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह या यात्रेत सहभागी झाल्याचे तिने सांगितले. इतकेच नाही तर तिच्या लहान मुलाला काश्मीर पर्यंत या यात्रेत सहभागी व्हायचे असल्याचे तिच्याकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी