मंत्रालयात आज एका तरुणाने पाचव्या मजल्यावरू उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीवर बलात्कार झाल्यानंतर तीने आत्महत्या केली होती. आपल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी तो मंत्रालयात वारंवार हेलपाटे मारत होता. गेल्या तीन वर्षांपासून तो आपल्या प्रेयसीला न्याय मिळावा म्हणून झगडत होता. मात्र निष्ठूर काळजाचे प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. तरुणाने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मंत्रालय आवारात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्त्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव बापू नारायण मोकाशी (वय 43 वर्षे) असे असून तो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे.
आज मंत्रालयात मंत्रीमंडळ बैठक होती. त्यामुळे मंत्रालयात मोठी गर्दी देखील झाली होती. बापू मोकाशी हा तरुण देखील आपल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयात आला होता. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे त्याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मत्रालयात संरक्षणात्मक जाळी लावलेली असल्यामुळे तो त्या जाळीवर पडला. त्यानंतर आरडाओरडा झाल्याने मंत्रालयातील पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी बापू मोकाशी याची समजूत काढत त्याला जाळीवरूण खाली उतरवले. त्यानंतर पोलिसांनी त्याची विचारपूस करुन त्याला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणारा बापू मोकाशी हा मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.
मंत्रालयात आज बापू नारायण मोकाशी या बीड जिल्ह्यातील तरुणाने पाचव्या मजल्यावरू उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/QkNJAxGYRR
— Lay Bhari (@LayBhari3) November 17, 2022
मंत्रालयात सध्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. राज्यभरातून अनेक लोक विविध कामांसाठी मंत्रालयात येत असतात. त्यामुळे सुरक्षायंत्रणांची देखील डोकेदूखी वाढली आहे. अनेकजण मंत्र्यांसोबत, आमदारांसोबत फिरायला म्हणून मंत्रालयात येतात त्यामुळे गर्दी आणखी वाढते, गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अभ्यगतांसाठी वेळ निश्चित केलेली आहे.
हे सुद्धा वाचा :
Bharat Jodo Yatra : देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांचा माफीनामा पहावा!; राहूल गांधींचा टोला
Underworld Dawn : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता
PHOTO: या सहा सोप्या सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी
यापूर्वी देखील मंत्रालयात आत्महत्येच्या प्रयत्नाच्या अनेक घटना घडल्या आहेत. 1 मार्च 2022 रोजी आज एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱया मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. मे 2022 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीने कुटुंबातील दोन महिलांसह मंत्रालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.