33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्हिडीओVIDEO : नेरूळमध्ये 'तिरंगा रॅली'

VIDEO : नेरूळमध्ये ‘तिरंगा रॅली’

यंदा देशभरातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत हा महोत्सव पार पाडण्यात येत आहे. याच महोत्सवाचे निमित्त साधत नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे गुरुवारी सकाळी नेरुळमध्ये रॅली ( ‘Tiranga Rally’ )काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगीनी पाटील यांनी केले. स्वातंत्र्यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत ही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’चे नाऱ्यांनी परिसर दणाणून गेले. सकाळी साडेसातच्या सुमारास वंडर्स पार्क जवळील आरटीओच्या टेस्टिंग ट्रॅक येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली.

वंडर्स पार्क जवळील आरटीओच्या टेस्टिंग ट्रॅक येथून सुरू झालेली ही रॅली नेरुळ सेक्टर 21 मधील डिमार्ट, मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ पोलीस ठाणे, हावरे मॉल आणि परत वंडर्स पार्क येथे पुन्हा परत येत या रॅलीचे राष्ट्रगीताने समाप्ती करण्यात आली. या रॅलीबाबतची माहिती आरटीओ कर्मचारी नितीन नांगरे यांनी दिली आहे.या रॅलीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगीनी पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेन्द्र निकम, गजानन गावंडे, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयातील कर्मचारी वर्ग,मोटार ट्रेनिग स्कुल यांचे मालक, वाहन मालक/चालक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी