29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रआम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

टीम लय भारी

औरंगाबाद : विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अजून चालुच आहे. सरकारने विलीनीकरण शक्य नसल्याचे यापूर्वीचं स्पष्ट केले असून त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसतील तर आम्हाला किमान स्वेच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी औरंगाबाद येथील १७२ कर्मचाऱ्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे(Voluntary death permission give to us : ST workers).

आपल्या निवेदनात एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, एस.टी. महामंडळात आम्हाला मिळणारे तुटपुंजी वेतन तसेच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आमच्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी, मागण्या पूर्ण करता येत नसतील तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी तरी द्यावी, अशी मागणीही कर्मचार्‍यांनी केली आहे.

६३ हजार संपकरी एसटी कर्मचारी वेतनापासून राहणार वंचित

एसटी कर्मचाऱ्यांचा संप गिरणी कामगारांच्या संपाच्या मार्गाने जावा : पडळकर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत निर्णय लागेल अशी अपेक्षा २० डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी कर्मचाऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर २२ डिसेंबर तारीख मिळाली पण त्यावेळी सुद्धा तोडगा निघाला नाही, तसेच ५ जानेवारीची पुढील तारीख देण्यात आली. त्यामुळे आज मुंबई हायकोर्टात आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गुजरातच्या एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी : शरद पवार

With strike entering 71st day, MSRTC to hire retired drivers

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी