33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeजागतिकन्यू यॉर्कमध्ये आणीबाणी : बॉम्बने केले अमेरिकेतील जनजीवन ठप्प; तापमान उतरले -45...

न्यू यॉर्कमध्ये आणीबाणी : बॉम्बने केले अमेरिकेतील जनजीवन ठप्प; तापमान उतरले -45 अंश सेल्सिअसवर!

जगभरात कोरोनाच्या साठीची नव्याने भीती घातली जात असतानाच अमेरिकेत बॉम्बने जनजीवन ठप्प केले आहे. तापमान -45 अंश सेल्सिअस इतके खाली उतरले आहे. या हाडे गोठविणाऱ्या थंडीमुळे न्यू यॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी आणीबाणी लागू केली आहे. अनेक शहरातील वीजपुरवठा पूर्णत: बंद झाला आहे. निम्म्याहून अधिक अमेरिका अंधारात आहे.

जगभरात कोरोनाच्या साठीची नव्याने भीती घातली जात असतानाच अमेरिकेत बॉम्बने जनजीवन ठप्प केले आहे. तापमान -45 अंश सेल्सिअस इतके खाली उतरले आहे. (Bomb Cyclone Emergency) या हाडे गोठविणाऱ्या थंडीमुळे न्यू यॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी आणीबाणी लागू केली आहे. अनेक शहरातील वीजपुरवठा पूर्णत: बंद झाला आहे. निम्म्याहून अधिक अमेरिका अंधारात आहे.

हा बॉम्ब म्हणजे नेमकी भानगड तरी काय आहे, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. हा बॉम्ब म्हणजे काही स्फोटक नसून ते एक भयानक चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाने अमेरिकेत जणू थंडीचा स्फोट घडवून आणला आहे. थंडीच्या भयानक लाटेने हिवाळा अमेरिकेतील जनतेचे जीव गुदमरणारा ठरत आहे. त्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीषण स्थिती आहे. बॉम्ब चक्रीवादळाने न्यू यॉर्क परिसरात तर भयंकर संकट निर्माण झाले आहे. अनेक राज्यात असह्य तापमान झाले आहे.

अमेरिकेतील काही लाख नांगरिग या भयानक थंडीच्या लाटेत अडकून पडले आहेत. लोकांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतले आहे. त्याशिवाय जीव वाचविण्याचा सध्या तरी पर्याय नाही. वीजेअभावी रूम हिटर बंद आहेत. लोक स्वत:ला ऊब मिळविण्यासाठी धडपडत आहेत. या आपत्तीतून किमान आणखी काही दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

New York Bomb Cyclone Emergency US Weather America Cold Wave
बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिकेत निर्माण झालेली भीषण स्थिती . फोटो क्रेडिट (छायाचित्र सौजन्य) : यूएसए टुडे

न्यू यॉर्कमध्ये एकीकडे पूरस्थिती आहे तर दुसरीकडे भयानक असे हाडे गोठवणारे तापमान आहे. त्यातच राज्याच्या काही भागात पाऊस पडत असल्याने तापमान कमी होत चालले आहे. रस्त्यांवर बर्फ साठून अपघात होत आहेत. दृश्यमानता कमी असल्याने विमान उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली आहे. आयोवा आणि डेस मोइनेससारख्या भागात तर तापमान -45 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागातील मोंटाना राज्यात उणे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पर्यंत घसरला. चक्रीवादळामुळे मध्य राज्यांच्या तापमानात घट झाली आहे. अनेक घरात वीज आणि पाणी नसल्याने परिस्थिती अजूनच गंभीर झाली आहे.

bomb cyclone bombogenesis winter hurricane New York Bomb Cyclone Emergency, US Weather, America Cold Wave
असे तयार होते बॉम्ब चक्रीवादळ

हे सुद्धा वाचा : 

चक्रीवादळापेक्षाही कोरोनाचे वादळ थांबवा; संजय राऊतांचा केंद्राला टोला

भविष्यात मुंबईत श्वास घेणे होईल कठीण; तज्ज्ञांनी दिला इशारा

ओमिक्रोनचा धोका कायम, यूके व यूएस मधील डेल्टाला मागे टाकले

जर 24 तासाच्या कालावधीत वादळाच्या मध्यभागी हवेचा दाब वेगाने 24 मिलीबार कमी झाला तर जोरदार वारे वाहू लागतात आणि बर्फ पडतो. या तीव्र चक्रीवादळाला बॉम्ब म्हटले जाते. सध्या थंड हवा अमेरिकेच्या पूर्व भागाकडे सरकत आहे. हवामानशास्त्रज्ञ असलेले अॅश्टन रॉबिन्सन कुक यांनी कडाक्याची थंडी आणि तीव्र वाऱ्यामुळे यापुढील काही दिवसात तापमान सहन करण्यापलीकडे, असह्य होऊ शकेल, असा इशारा दिला आहे.

New York Bomb Cyclone Emergency, US Weather, America Cold Wave

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी