29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeराजकीयआमदार रोहित पवार लागले कामाला : मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वरिष्ठ अधिकार्यांसोबत भेटींचा...

आमदार रोहित पवार लागले कामाला : मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वरिष्ठ अधिकार्यांसोबत भेटींचा सपाटा

सत्तार शेख | लयभारी न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत गुरूवारी आढावा बैठक घेतल्यानंतर या बैठकीतून समोर आलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या भागाचे आमदार रोहित पवार आता पुढे सरसावले आहेत. पवार यांनी अहमदनगर गाठत जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर विविध वरिष्ठ कार्यालयातील अधिकार्यांच्या भेटी घेत कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध प्रश्नासंबधीत लेखी पाठपुरावा केला. तालुकास्तरीय आढावा बैठकीतून पुढे आलेल्या प्रश्नांवर आमदार रोहितदादा पवार यांनी लागलीच उपाययोजना हाती घेतल्याबद्दल मतदारसंघातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी अहमदनगर येथे भेट दिल्यानंतर केलेल्या पाठपुराव्याची शनिवारी सविस्तर फेसबुक पोस्ट लिहली आहे. आपल्या फेसबुकपोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, अहमदनगर येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पोलीस प्रशासन, महावितरण यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून कर्जत जामखेड तालुक्यांमधील प्रश्नासंबधीत लेखी पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. पाटील यांच्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असणाऱ्या रिक्त पदांचा विषय सोडवणे, दोन्ही तालुक्यातील काही ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज, जामखेड तालुक्यातील ५२ शाळांच्या निर्लेखनास दिलेली मंजूरी व त्यामुळे विद्यार्थांच्या शाळेत बसण्यासाठी झालेली अडचण म्हणून तात्काळ नवीन बांधकामास मंजूरी, जामखेडमधील मुलींच्या शाळेची वादळी पावसामुळे झालेले नुकसान व महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे रस्तेमार्गाची दुरुस्ती करण्यासंबधीत या भेटीत चर्चा झाल्या.

या सोबतच महावितरणचे सांडगे साहेब यांच्यासोबत वारंवार ट्रान्सफॉर्मर बिघडतो अथवा बंद पडतो. या कामात बऱ्याचदा दिरंगाई होते त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होते परिणामी तांत्रिक समस्या सोडवणे, रिक्त पदे भरणे, महावितरण मार्फत शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आहेत मात्र तांत्रिक समस्यामुळे अशा योजनांपासून शेतकरी वंचित राहतात अशा योजनांमधील उणीवा दूर करणे, दोन्ही तालुक्यातील ५० हून अधिक वाढीव वस्त्यांवर ट्रान्सफॉर्मर व सिंगल फेज वीज जोडणीची गरज आहे त्यासाठी सहकार्य करणे तसेच बऱ्याचजणांनी शुल्क भरुन देखील वीजजोडणी करण्यात आली नाही असे प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आमदार रोहित पवार लागले कामाला : मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वरिष्ठ अधिकार्यांसोबत भेटींचा सपाटा

तसेच अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांची भेट घेवून प्रलंबित असणारे पोलीस स्टेशन, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी, महिलांची सुरक्षितता, खोट्या गुन्ह्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याविषयी पाठपुरावा करण्यात आला. याचबरोबरीने राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक दिवाण साहेब, PWD विभागाचे कार्यकारी अभियंता राऊत साहेब व दत्तात्रय गावडे साहेब, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता अरविंद कोकरे साहेब यांच्यासह वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत चर्चेतून कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला असे आमदार पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी