32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या 'या' नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

टीम लय भारी

मुंबई: नुकतीच दोन दिवसांपूर्वी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली.केंद्राकडून केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर केला जात असताना, आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी सुरु झाली आहे. आता नुकतीच दोन दिवसांपूर्वी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.(Income tax raid on the house of Shiv Sena’s ‘Ya’ leader after NCP)

 महाविकास आघाडीचे नेते देखील या प्रकरणी आक्रमक झालेले दिसून येतायत. त्यात आता आज सकाळी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पथक शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहेत.

प्राप्तिकर विभागाचं पथक मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील घऱी दाखल झाले आहेत. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात  करण्यात आली आहे.

Income tax raid on the house of Shiv Sena's 'Ya' leader after NCP

हे सुद्धा वाचा

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर ‘मविआ’चे आंदोलन सुरू

वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा भाजपवर निशाण, लवकरच आणखी घोटाळे बाहेर काढू

दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे, पाटीलवर हल्लाबोल

Mumbai: I-T raids Shiv Sena Yashwant Jadhav corporator

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते असल्याने या कारवाईमुळे राजकीय वातावरण अजून पेटणार याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले होते. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला होता. हे सर्व पैसे बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावर ही कारवाई होत असल्याचं समोर येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी