27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जत - जामखेडमधील विकासकामे चोरीला : रोहित पवारांचे राम शिंदेंवर टिकास्त्र

कर्जत – जामखेडमधील विकासकामे चोरीला : रोहित पवारांचे राम शिंदेंवर टिकास्त्र

लयभारी न्यूज नेटवर्क 
जामखेड : प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या एका चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली तशीच कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत. चार दोन लोकं मोठी होत असतील तर त्याला विकास म्हणत नाहीत तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते त्याला विकास म्हणतात असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी केले.
कर्जत - जामखेडमधील विकासकामे चोरीला : रोहित पवारांचे राम शिंदेंवर टिकास्त्र
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील आनंदवाडी, धामणगाव,तेलंघशी,गीतेवाडी, दरडवाडी,चव्हाणवाडी,सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा शनिवारी गावभेट दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला. मंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात लावलेल्या विकास कामांच्या फ्लेक्सवर रोहित पवार यांनी जोरदार टिका केली.
परिसरातील बालाघाट डोंगररांगेतील गावांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकं स्थलांतर करतात. आता हेच चित्र बदलवण्यासाठी मी या भागात आलो आहे. मला भविष्यात एवढे काम करायचे आहे की कोणालाही ऊस तोडणीसाठी जावे लागणार नाही. तरुणांना रोजगार,महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न मंत्र्यांनी कधी केला नाही.शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले का?
– रोहित पवार
कर्जत - जामखेडमधील विकासकामे चोरीला : रोहित पवारांचे राम शिंदेंवर टिकास्त्र
गावोगावी जावून प्रत्यक्ष भेट घेऊन पवार हे तेथील ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. ग्रामस्थांच्या असलेल्या मागण्या,महत्वाचे प्रश्न नमुद करून घेत आहेत.ग्रामस्थ व महिला वर्गाचीही मोठी गर्दी होत असुन उद्याच्या काळात शेती,शिक्षण,पाणी, आरोग्य आदी प्रश्न सोडवण्यासाठी पवार हेच पर्याय असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहेत.
[box type=”shadow” align=”aligncenter” class=”” width=””]’नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे आम्ही अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]
मतदारांना आकर्षित करणार ठरू लागला रोहित पवारांचा साधेपणा
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हे गावभेट दौरे करत असताना त्यांच्या या दौऱ्यात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोहित पवारांभवती जमणार्या गर्दीतले चेहरे अनेक प्रश्न,अडीअडचणी घेऊन थेट रोहित पवार यांच्याशी संवाद साधत आहेत. रोहित पवार गावभेट दौर्यात थेट जमिनीवर जनतेत बसून संवाद साधत आहेत. रोहित पवारांचा हाच साधेपणा जनतेला मोठ्या प्रमाणात भावत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी