28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमाण – खटावचा विकास ‘शिवराळ’ भाषेतून होणार नाही : वंचित बहुजन आघाडीने...

माण – खटावचा विकास ‘शिवराळ’ भाषेतून होणार नाही : वंचित बहुजन आघाडीने ठणकावले

लय भारी न्यूज नेटवर्क

बिदाल : माणमध्ये सत्ताधारी व विरोधक हे विकासाची फक्‍त टिमकी वाजवतात. त्यांनी विकासाचे गाजर दाखवून जनतेला झुलवत ठेवले आहे. पण जनता दुधखुळी नाही. शिवराळ भाषा वापरुन विकास होत नसतो. याचा बोध सत्ताधाऱ्यांनी घ्यावा, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे माण तालुका प्रभारी योगेश घोलप आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. वैद्यकीय क्षेत्रातील सज्जन व्यक्ती असलेल्या डॉ. प्रमोद गावडे यांनाच माण – खटावमधील जनतेने निवडून द्यावे असे आवाहनही घोलप यांनी केले. शेवरी गावामध्ये वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

माण – खटावचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. निवडणुकीच्या तोंडावर ते तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. गोरे यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत राजकारणामध्ये गुंडगिरी, दादागिरी वाढली. सामान्य लोकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार या काळात वाढले. त्या पार्श्वभूमीवर घोलप यांनी सडकून टीका केली

माण तालुक्‍यातील उत्तर भागातील शेतकरी पाण्यासाठी व्याकुळ आहेत. मग तुमच्या मताच्या आधारे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी काय करीत होते, असा प्रश्‍न त्यांना विचारण्याची आता वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी लोकहिताच्या निर्णयापेक्षा पक्षाच्या नेत्याच्या हिताचा विचार करत आहे. कारण पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले तर पुढील काळात निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, या भीतीमुळे लोकप्रतिनिधी आजपर्यंत गप्प राहिल्याने माण  तालुक्‍यातील उत्तर भाग दुष्काळाने वेढला आहे.

– डॉ. प्रमोद गावडे, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी

[box type=”warning” align=”aligncenter” class=”” width=””]’नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]

शेवरी गावात योगेश घोलप बोलताना म्हणाले की, माण – खटाव मतदारसंघात रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजांवर पाच वर्षात काम झालेले नाही. तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पाच वर्षात एकही नवा रस्ता झालेला नाही. फक्त घोषणाबाजी झाली आहे. विजेचाही लपंडाव सुरुच असून, वीज रोहित्र जळाल्यानंतर ते अठ्ठेचाळीस तासात मिळणे बंधनकारक आहे. मात्र, पैसे देऊन ते आठ दिवसांनी सुद्धा मिळत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी