28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : यात्रा, जाहीर कार्यक्रम रद्द करा, लग्नामध्येही गर्दी नको : उद्धव...

VIDEO : यात्रा, जाहीर कार्यक्रम रद्द करा, लग्नामध्येही गर्दी नको : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपेंच्या सुचना

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’बाधितांची ( Coronavirus ) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यात्रा, जाहीर सोहळे, संमेलने रद्द करण्यात यावीत. याबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील. लग्न सोहळे सुद्धा मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच आयोजित करा अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

शहरी भागातील सगळ्या शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील. मॉल्स, सिनेमागृहे व नाट्यगृहे सुद्धा बंद राहतील. किराणा मालाची दुकाने, रेल्वे, बसेस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या सुरू राहतील. परंतु गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सिनेमागृहे व नाट्यगृहे बंद करण्याचे जाहीर आदेश आम्ही दिलेले आहेत. आम्ही जे बोलतोय तोच आमचा आदेश आहे. प्रत्येकाला लेखी आदेश मिळणार नाहीत. त्यामुळे मॉल्स, सिनेमागृहे व नाट्यगृहे तात्काळ बंद करावीत. जे बंद करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल अशी सक्त ताकीद सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हे सुद्धा वाचा

राज्यातील शहरी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार : राजेश टोपे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी