31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रपुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता लष्करालाही केले पाचारण

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता लष्करालाही केले पाचारण

टीम लय भारी
पुणे : भारतीय वायुदल आणि नौदलाच्या महत्वपूर्ण मदतीनंतर पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी आता भारतीय लष्कर सुद्धा धावून आले आहे. army(number of areas in many states are likely to be impacted by floods.)

4 दिवसांपासून सतत आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. (The flood relief columns include engineering efforts and medical teams from Army for providing necessary first aid and medicines)

चिपळूण – खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत

 

Army
मिलीटरी

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या भागांत अतिवृष्टीमुळे पूर आलेले आहेत. त्याचमुळे नागरी प्रशासनाच्या विनंतीवरून लष्कराने बचाव पथके जोडण्यास सुरुवात केलेली आहे.

औंध मिलीटरी स्टेशन आणि पुण्यातील बॉंबे इंजिनिअर ग्रुप च्या एकूण 15 मदत तुकड्या रत्नागिरी व रायगड येथे रात्रभर कार्यरत आहेत. तसेच ही पथके परिस्थिती पुर्णपणे आटोक्यात येईपर्यंत घटनास्थळी मदत कार्य करणार आहेत असे समजते. (Indian Army stands with people in these testing times )

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्राबरोबर परप्रांतीय उमेश कामत आरोपी, बदनामी मात्र मराठमोळ्या उमेश कामतची !

LoC, cameras, action — how hi-tech equipment is helping Indian Army guard the border better

GOC-IN-C दाक्षिणात्य लष्करातील लेफ्टनंट जनरल जे एस नैन म्हणाले की पुराच्या पाण्यात फसलेल्या नागरिकांना विशेष सहकार्य देऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करण्यात येईल. या कठीण काळात भारतीय लष्कर सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी खंबीर उभे असेल. (Indian Army stands with people in these testing times)

या मदत पथकांत अभियंत्यांसोबतच डॉक्टर सुद्धा कार्यरत आहेत. ज्यांना प्रथमोपचाराची गरज लागेल त्यांच्यावर यथोचित प्राथमिक उपचार लष्कराच्या डॉक्टर कडून केले जातील. व आवश्यक तेवढी औषधे पुरवली जातील

https://youtu.be/iaVCpXCU-nE

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी