28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजचौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात... भारतीय गोलंदाजांकडे सर्वांचे लक्ष

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात… भारतीय गोलंदाजांकडे सर्वांचे लक्ष

टीम लय भारी

मुंबई: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी शनिवारी ता(.७) सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता.६) तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव 278 धावांमध्ये गुंडाळले आहे. यानंतर आता भारतीय गोलंदाजांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे (Team India against England first Test has started).

भारताकडून सलामीवीर के. एल. राहुलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. तर रवींद्र जाडेजाने देखील (56) अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावांचे योगदान दिले. तर इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने भारताचे 5 गडी बाद केले. तर जेम्स अँडरसनने 4 गडी बाद केले. इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांत गुंडाळल्यामुळे भारताला 95 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 11 षटकात बिनबाद 25 धावांपर्यंत मजल मारली होती.

भाल्याची पोहोच सुवर्णपदकापर्यंत, खणखणलं चक्क सोनं!

भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; असा मिळवला विजय

Team India against England first Test has started
टीम इंग्लंड

दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी प्रत्येकी एका सत्राचा खेळ पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी 98 षटकांचा खेळ होणार आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटनच्या ग्रेटराणी समोर भारतीय महिला संघाची शरणागती

India vs England 1st Test Day 4 Live Updates: Bumrah strikes, Root leads counter-attack

भारताकडे महत्त्वपूर्ण आघाडी

पहिल्या डावात भारतीय संघाला 95 धावांची आघाडी मिळाली आहे. ही आघाडी जरी फार मोठी नसली तरी या सामन्यात निर्णायक ठरणार आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांची जादू चालली तर भारतीय संघाला दुसऱ्या डावात 100-125 धावांचे लक्ष्य मिळू शकते, असे क्रिकेट विश्लेषक यांचे मत आहे. त्यामुळे या सामन्यात आता भारताचे पारदे जड आहे (Team India has a 95-run lead in the first innings).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी