28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमनोरंजनमराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, खुद्द पत्नीने केली तक्रार

मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, खुद्द पत्नीने केली तक्रार

टीम लय भारी

पुणे : मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार केली आहे(Aniket vishwasrao is in trouble, a case has been registered against him)

शारीरिक छळ केल्याचे सुद्धा समोर आले आहे. या संबंधी स्नेहा अनिकेत विश्वासराव(वय२९)यांनी तक्रार केली आहे.

‘ही माती नाही, शेण आहे,’ म्हणत सोनू सूदच्या फोटोवर नेटकऱ्यांची मजेशीर टिपणी

Entertainment : इनडोअर खेळांसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार, राज्य सरकारची अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध

स्नेहा विश्वासराव यांनी केलेल्या तक्रारीत मराठी सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा आपल्या पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच लोकांसमोर मारहाण करून अपमानास्पद वागणूक देत अतोनात छळ केल्याचाही तिने सांगितले आहे. या सर्व प्रकरणी अनिकेत आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aniket vishwasrao is in trouble, a case has been registered against him
अनिकेत विश्वासराव हा मूळचा मुंबईचा राहणारा आहे

राजकुमार आणि पत्रलेखा यांचा लग्नातला फोटो वायरल,दोघांच्या लूकची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा

Pune: Case against Marathi actor Anekar Vishwasrao for assaulting wife

अनिकेत विश्वासराव हा मूळचा मुंबईचा राहणारा आहे. २०१८ साली ती दोघं विवाहबंधनात अडकली होती. स्नेहा हि सुद्धा एक अभिनेत्री असून तिने पण अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे.

Aniket vishwasrao is in trouble, a case has been registered against him
२०१८ साली ती दोघं विवाहबंधनात अडकली होती

मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. या सगळ्यामधूनच स्नेहा हिने पोलिसांत तक्रार केली आहे. अनिकेतने देखील मराठी चित्रपटांत काम केले आहे. तसेच त्याने ऊन-पाऊस आणि कळत नकळत ह्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी