टीम लय भारी
कणकवली : शिवसेनेवर कायम आगपाखड करणारे भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी काल (दि. 04 जुलै) सोशल मिडीयावर पोस्ट करत शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. “तुमची लायकी आता फक्त बटन दाबण्यापूर्ती” असे म्हणून शिवसेनेला राणे यांनी यावेळी ललकारले आहे.
निलेश राणे कायम सोशल मिडीयावर चांगलेच सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात, मात्र दरवेळी राणे यांचा शिवसेनेवरच कायम निशाणा असल्याचे पाहायला मिळते. यावेळी सुद्धा निलेश राणे यांनी शिवसेनेलाच टार्गेट केले असून त्यावर हजारो लाईक्सचा पाऊस पडला आहे.
निलेश राणे त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहितात, “सोशल मीडियावर आणि इलेक्ट्राॅनिक मीडियासमोर पुरुषार्थ दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिम्मत असेल तर विधीमंडळाचं शिवसेना पक्ष कार्यालय उघडून दाखवा”, असे खुले आव्हान राणे यांनी यावेळी शिवसेनेला केले.
पुढे राणे लिहितात, विधीमंडळ पक्ष कार्यालय लांब राहिलं, गेटपर्यंत तरी जाऊन दाखवा. तुमची लायकी आता फक्त बटन दाबण्यापूर्ती असे म्हणून शिवसेनेला त्यांनी टोला लगावला आहे.
हे सुद्धा वाचा…
बंडोबा – भाजप युती सरकार आज बाजी मारणार? विधानसभेत बहुमत चाचणीचे आव्हान
चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा
वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी ‘या’ कारणासाठी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट