30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रबंडोबा - भाजप युती सरकार आज बाजी मारणार? विधानसभेत बहुमत चाचणीचे आव्हान

बंडोबा – भाजप युती सरकार आज बाजी मारणार? विधानसभेत बहुमत चाचणीचे आव्हान

टीम लय भारी

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. काल (दि. 04 जुलै) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची लढाई जिंकून युती सरकारने अर्धा गड सर करण्यात यश मिळवले आहे, परंतु आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीचे मोठे आव्हान बंडोबा – भाजप युती सरकार समोर असणार आहे. सकाळी 11 वाजता विधीमंडळाचे कामकाज सुरू होणार आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले आणि महाविकास आघाडीचे सरकार दणकन आपटले. दरम्यान बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपला जवळ करत युतीचे सरकार स्थापन केले. या सत्तांतराच्या अभूतपुर्व पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून नव्या सरकारला आता बहुमत चाचणी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बहुमत चाचणीत कस लागणार आहे. बहुमत चाचणीसाठी भाजप आणि बंडोबा गटाकडून काल आपापल्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले, रणनीती ठरविण्यात आली अशी मुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

सरकारकडे पुरेसे बहुमत असले तरीही कधी काय घडेल याचा नेम नाही म्हणून याबाबत पुरेपूर काळजी घेत पक्षांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान आमदारांनी व्हिप न पाळल्यामुळे शिवसेनेने आक्रमक झाली असून शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांना 29 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे, त्यामुळे आजच्या अधिवेशनात काय काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा :

मुंबईच्या ‘या’ माजी पोलिस आयुक्तांच्या मागे लागली ईडीची पीडा

आरे वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंचे एकमत

लब्यू उद्धवजी, मराठी अभिनेत्याचे उद्धव ठाकरे यांना पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी