30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeव्हिडीओVideo : 'सूर नवा, ध्यास नवा'च्या स्पर्धकांना मिळाली सुवर्णसंधी

Video : ‘सूर नवा, ध्यास नवा’च्या स्पर्धकांना मिळाली सुवर्णसंधी

कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा ‘सूर नवा, ध्यास नवा – पर्व ५ वे’ या संगीत रिऍलिटी शो ने प्रक्षकांची मने जिंकलेली आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक (contestants) आपल्या सुमधुर आवाजांनी सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. या शो चे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी करत असून गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करत आहेत. आता या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना एक सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे, या कार्यक्रमामध्ये दर आठवड्याला सर्वोत्कृष्ट गायन करणाऱ्या स्पर्धकाला कट्यार दिली जाते.

पण आता ज्या गायकाला किंवा गायिकेला कट्यार मिळणार त्यांना आता स्वतःचे गाणे गाण्याची संधी मिळणार आहे. याबाबतची माहिती नुकतीच कलर्स वाहिनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्पर्धक आणखी जोमाने आपली गाणी गाणार आहेत. हि कल्पना अवधूत गुप्ते यांनी सुचविल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली आहे. स्पर्धक शुभम सातपुते याला नवे गाण्याची पहिली संधी मिळाली आहे. संगीत दिग्दर्शक मिलिंद जोशी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे तर, संगीतकार कौशल इनामदार यांनी ता गाण्याला चाल लावली आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी