31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeजागतिकAmerica : अमेरिकेतल्या 'या' भागात झाली बत्तीगुल

America : अमेरिकेतल्या ‘या’ भागात झाली बत्तीगुल

अमेरिकेमध्ये (America) झालेल्या वादळाने प्रंचड नुकसान झाले असून, जनजिवन विस्कळीत झाले आहे. सर्वांत जास्त फटका फ्लोरिडामध्ये बसला आहे.

अमेरिकेमध्ये (America) झालेल्या वादळाने प्रंचड नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वांत जास्त फटका फ्लोरिडामध्ये बसला आहे. फ्लोरिडाच्या दक्षिण भागाला वादळचा मोठा फटका बसला. यावेळी फोर्ट मायर्स शहराचे सर्वांत मोठे नुकसान झाले. या भागात अतिशय जोरदार वारे वाहत होते. तसेच मुसळधार पाऊस देखील कोसळत होता. समुद्राला मोठे उधाण आले होते. त्यामुळे शार्क सारखे मासे देखील किनाऱ्यावर तसेच रस्त्यांवर वाहून आले होते. या वादळामुळे अनेक घरे पत्त्यांसारखी कोसळली. अमेरिकेतल्या अनेक भागात बत्तीगुल झाली आहे. क्यूबा आणि फ्लोरिडा तसेच जॉर्जिया, कॅलोरिनामध्ये वादळाची तीव्रता सर्वांत जास्त होती. त्यामुळे या भागातील वीज खंडीत झाली आहे.

तसेच वीजेचे खांब आणि झाडे देखील उन्मळून पडली आहेत. त्यामुळे फ्लोरिडामध्ये बत्तीगुल आहे. सोशल मीडियावर वादळाचे व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहेत. वाऱ्याचा वेग इतका भयंकर होता की, माणसांना उभे देखील राहता येत नव्हते. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने वस्तुंचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. तर होडीतून प्रवास करणारे सुमारे 23 जण बेपत्ता झाले आहेत. समुद्र क‍िनारी भागात 2 ते 7 किमी उंचीच्या लाटा उसळत होत्या. स्टॉक आयलॅजवळ एक होडी पाण्यात बुडाली. या होडीमध्ये क्यूबाचे 23 प्रवासी होते. अमेरिका कोस्ट गार्ड वाहून गेलेल्या लोकांचा तपास करत आहे. तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्यूबा आणि फ्लोरिडा तसेच जॉर्जिया, कॅलोरिनामध्ये वादळाची तीव्रता सर्वांत जास्त होती.

हे सुद्धा वाचा

Alia Bhatt : ‘माझे नाव घेणे थांबवा’ आलियाने केली करण जोहरला विनवणी

CDS : भारताच्या ‍संरक्षणदल प्रमुख पदी अन‍िल चौहान यांची नियुक्ती

Virus Crises : कोरोनानंतर ‘या’ व्हायरसने वाढवली पुन्हा धाकधूक

सुमारे 25 लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एक आठवडयासाठी फ्लोरिडामध्ये आणिबाणी घोषीत करण्यात आली आहे. वादळग्रस्त भागात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांच्या घरात चार फूटांपर्यंत पाणी भरले आहे. गाडयांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. टम्पा, पॅमब्रोक पाइन्स, नॉर्थ पेरी मधील विमानतळं बंद करण्यात आली आहेत. हवामान तज्ञांच्या मते हा वातावरण बदलाचा फटका बसला आहे. संपूर्ण जगात अनेक भागांमध्ये अशी मोठी चक्रीवादळे आणि महापूर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कॅनडामध्ये देखील भयंकर वादळ आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी