30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रMahesh Manjarekar : 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या निषेधार्थ नेसरी येथे...

Mahesh Manjarekar : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या निषेधार्थ नेसरी येथे निषेध मोर्चा

नेसरी गावात युद्ध झाले तेथील गावकऱ्यांनी महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या निषेधार्थ आज आंदोलन केले. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा दावा येथील गावकऱ्यांनी केला आहे

अदिलशाही सरदार बहलोल खान आणि प्रतापराव गुजर व त्यांचे सहा साथीदार यांच्यात ज्या नेसरी गावात युद्ध झाले तेथील गावकऱ्यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या निषेधार्थ आज आंदोलन केले. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा दावा येथील गावकऱ्यांनी केला आहे. नुकताच महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील व्यक्तीरेखा साकारणाऱ्या कलाकारांचे पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. तसेच या व्यक्तीरेखांची चित्रपटातील नावे देखील जाहीर झाली.
मात्र या चित्रपटात सात योद्ध्यांची नावे बदलण्यात आल्याचा दावा काही अभ्यासकांनी केला. त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती पुण्यात पत्रकार परिषद घेत चित्रपटांतून शिवकालीन इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप केला. तसेच चुकीचा इतिहास दाखवल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही यावेळी संभाजीराजेंनी दिला होता.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी (ता. गडहिंग्लज) गावातील गावकऱ्यांनी देखील महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाला विरोध केला आहे. आज (8 नोव्हेंबर) येथील गावकऱ्यांनी मोर्चा काढत महेश मांजरेकर यांचा निषेध केला. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आमच्या गावात येऊन सात योद्ध्यांचा इतिहास समजून घ्यावा अशी भावना गावकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली.

काय आहे वाद ?
नेसरीच्या लढाईक प्रतापराव गुजर यांच्यासोबत बहलोलखानाच्या फौजेवर तुटून पडणाऱ्या सहा मावळ्यांची नावे विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे असल्याचे इतिहास अभ्यासकांचा दावा आहे. तर या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या सात मावळ्यांमधील सहा मावळ्यांची नावे दत्ताजी पागे, जिवाजी पाटील, चंद्राजी कोठार, मल्हारी लोखंडे, सूर्याजी दांडकर आणि तुळजा जामकर अशी असल्याचे चित्रपटाचे पोस्टर रिलीझ झाल्यानंतर समोर आले त्यामुळे या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला जात आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटाला विरोध केला आहे. मावळ्यांची वेषभूषा ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी