29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : दोन महिन्यांत काय होईल सांगता येत नाही; दानवे यांचे...

Maharashtra Politics : दोन महिन्यांत काय होईल सांगता येत नाही; दानवे यांचे बुचकुळ्यात पाडणारे विधान

सध्याच्या राजकीय वातावरणाबबत बोलताना त्यांनी, येत्या दोन महिन्यात काय होईल हे सांगता येत नाही, असे वक्तव्य केले, त्यामुळे राजकीय वातावरणात सध्या चर्चांना उधान आले आहे.

भाजपचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणाबबत बोलताना त्यांनी, येत्या दोन महिन्यात काय होईल हे सांगता येत नाही, असे वक्तव्य केले, त्यामुळे राजकीय वातावरणात सध्या चर्चांना उधान आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. एका रात्रीत अशी जादू झाली की, महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता पुढच्या दोन महिन्यात राज्यात काय होईल सांगता येत नाही. दानवे यांच्या या विधाना नंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात असून चर्चांना उधाण आले आहे.
कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील विविध शेतीपूरक प्रकल्पाचा शुभारंभ आणि दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमांसाठी मंत्री दानवे उपस्थित होते. याकार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती, मात्र निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय भाजप सरकार बनवू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांना देखील आपल्या बोलण्यातून कोपरखळी मारली. कन्नडचे आमदार राजपूत यांनी दानवे यांना कार्यक्रमात म्हणाले की, तुमचे सरकार आल्याने आमच्या कामांना स्थगिती मिळाली आहे, विकासकामांतील स्थगिती उठवा अशी मागणी राजपूत यांनी केल्यानंतर दानवे त्यांना म्हणाले, तुम्ही गुवाहाटीला गेले नसता तर कामांना स्थगिती मिळाली नसती, आता स्थगिती उठवायची असेल तर तुम्हाला गुवाहाटीला जावे लागेल. दानवे यांनी असे बोलताच कार्यक्रमात मोठा हास्य कल्लोळ माजला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी