29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रBharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा : बाळासाहेब थोरात यांचे 'परफेक्ट...

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा : बाळासाहेब थोरात यांचे ‘परफेक्ट मॅनेजमेंट’

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राज्यात 14 दिवस भारत जोडो यात्रा झाली. बुधवारी (दि.23) रोजी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात पुढे पोहचली. कन्याकुमारी पासून सुरू झालेली ही पदयात्रा काश्मिरपर्यंत सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात या यात्रेची जबाबदारी भारत जोडो यात्रेचे समन्वयक म्हणून विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. या यात्रेचे अत्यंत यशस्वी नियोजन त्यांनी पक्षातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन केले.

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राज्यात 14 दिवस भारत जोडो यात्रा झाली. बुधवारी (दि.23) रोजी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात पुढे पोहचली. कन्याकुमारी पासून सुरू झालेली ही पदयात्रा काश्मिरपर्यंत सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात या यात्रेची जबाबदारी भारत जोडो यात्रेचे समन्वयक म्हणून विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. या यात्रेचे अत्यंत यशस्वी नियोजन त्यांनी पक्षातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन केले. त्यासाठी भारत जोडो यात्रा ज्या मार्गावरून जाणार आहे त्यामार्गावर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अनेक दौरे केले.

भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून मेहनत घेतली जात होती. त्यामुळे अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने राज्यात यात्रा पार पडली. यात्रेला मोठा पाठिंबा मिळाला. अनेक पक्ष, संघटना, शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण, तरुणी, लहान मुले, अपंग, साहित्यिक, लोककलावंत, यांचा यात्रेला भरभरून पाठिंबा मिळाला.

राज्यात साधारण पाऊणे चारशे किलोमीटर ही यात्रा होती. या यात्रेचा मार्ग, सभा, भोजन, मुक्काम यासाठी बाळासाहेब थोरात यांनी जातीने लक्ष घालत ही यात्रा पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. विदर्भ, मराठवाड्यातील नेत्यांचे देखील या यात्रेच्या व्यवस्थापनासाठी थोरात यांना मोठे सहकार्य लाभले. यात्रे दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन थोरात यांनी पक्षातील सहकाऱ्यांच्या सहकार्याने केले. यात्रे दरम्यान राहूल गांधी यांचा चहा नाश्ता, त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वेळा अशा बारीकसारीक बांबींचे अत्यंत सुक्ष्म नियोजन या यात्रेत करण्यात आले होते.

या यात्रेचे इव्हेंट मॅनेजमेंट इतके नियोजनबद्ध झाल्यामुळे महाराष्ट्रात या यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. भारत जोडो यात्रेचे समन्वयक म्हणून बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका अंत्यत नेटकी सांभाळली. महाराष्ट्रात देगलूर येथे भारत जोडो यात्रेचे आगमन झाले त्यानंतर ही यात्रा नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या मार्गावरून पुढे मध्यप्रदेशात मार्गस्थ झाली.
हे सुद्धा वाचा :

Bhagat Singh Koshyari : ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव, राज्यपालांना हटवा!

Ravikant Tupkar: …अन्यथा अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ; रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

Sambhaji Bhide: संभाजी भिडे यांना ‘टीकली’ प्रकरणी उत्तर देण्यासाठी हवी आहे 10 दिवसांची मुदत; महिला आयोगाला अर्ज

यात्रेत वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी सहभागी व्हावे यासाठी देखील बाळासाहेब थोरात यांनी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली. अनेक संघटना, पक्ष, वेगवेगळ्या विचारांचे लोक या यात्रेत सहभागी झाल्यामुळे ही यात्रा अत्यंत उत्साहात पार पडली. थोरात यांनी पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेत या यात्रेचे नियोजन पार पाडले. युवक काँग्रेसचे देखील या यात्रेत मोठे योगदान राहीले. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या नियोजन कौशल्याचे देखील मोठे कौतुक झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी